करवा चौथच्या देसी लूकनंतर कतरिना कैफचा ग्लॅमरस अंदाज, ब्लॅक ड्रेसमध्ये दिल्या हटके पोझ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2022 16:55 IST2022-10-19T16:52:25+5:302022-10-19T16:55:00+5:30

Katrina Kaif : पुन्हा एकदा कतरिना कैफने ग्लॅमरस फोटोशूट केले आहे, जे मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ तिच्या सौंदर्यामुळे नेहमीच चर्चेत असते आणि दररोज तिचे सुंदर फोटो शेअर करत असते. (फोटो: इंस्टाग्राम)

पुन्हा एकदा कतरिना कैफने तिच्या इंस्टाग्रामवर तिच्या ग्लॅमरस फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत, जे मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

या फोटोंमध्ये कतरिनाने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे, ज्यात ती हॉट दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

तिचा लूक पूर्ण करण्यासाठी कतरिना कैफने न्यूड मेकअप केला आहे आणि केसांची उंच पोनीटेल बनवली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

हे फोटो शेअर करत कतरिना कैफने 'काली तेरी...' असे कॅप्शन दिले आहे. आज रात्री गाणे लॉन्च. (फोटो: इंस्टाग्राम)

सध्या कतरिना कैफ तिच्या आगामी 'भूत पोलिस' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

कतरिना कैफ स्टारर 'भूत पोलिस' हा चित्रपट ४ नोव्हेंबरला थिएटरमध्ये दाखल होणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

या चित्रपटात कतरिना शिवाय सिद्धांत चतुर्वेदी आणि ईशान खट्टर देखील दिसणार आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)