तमन्ना भाटियासारखं फिट आणि सुंदर दिसायचंय? अभिनेत्रीने सांगितलेला सीक्रेट डाएट प्लान करा फॉलो

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2025 15:15 IST2025-04-19T13:26:14+5:302025-04-19T15:15:40+5:30

तमन्ना भाटिया इतकी फिट कशी? अभिनेत्रीने सांगितलेला डाएट प्लान सर्व फॉलो करतील इतका सोप्पा आहे (tamannah bhatia)

तमन्ना भाटिया ही बॉलिवूडसह साउथ इंडस्ट्रीत दबदबा असणारी लोकप्रिय अभिनेत्री. २०२४ मध्ये रिलीज झालेल्या आज की रात या गाण्याने तमन्ना लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली

तमन्ना भाटिया शूटिंगच्या व्यस्त दिनक्रमातूनही स्वतःच्या फिटनेससाठी आवर्जुन वेळ काढतेय. तमन्नाने एका मुलाखतीत तिचा डाएट प्लान शेअर केलाय.

सकाळी उठल्यावर योग आणि रनिंग करुन ती तिच्या दिवसाची सुरुवात करते. यामुळे तिला दिवसभराची एनर्जी मिळते.

सकाळी उठल्यावर सर्वात आधी तमन्ना कोमट पाण्यात लिंबू आणि मध मिक्स करुन ते पाणी पिते. यानंतर ब्रेकफास्टमध्ये अभिनेत्री भिजवलेले बदाम आणि डोसा खाते.

तमन्नाच्या जेवणात मासे, चिकन आणि अंड्यांचा समावेश असतो. आवडीचे पदार्थ खाऊन तमन्ना पोटभर जेवते.

याशिवाय जेवणात प्रत्येक वेळी हिरव्या भाज्यांचा समावेळ करते. अत्यंत साध्या आणि घरगुती पद्धतीने तमन्ना तिचा डाएट फॉलो करते

तमन्ना डाएटसोबत जीममध्ये जाऊन वर्कआऊट करुन घाम गाळते अशाप्रकारे शरीराला चांगला आकार देण्यासाछी तमन्ना कसून मेहनत करताना दिसते. तमन्ना लवकरच आगामी 'रेड २' सिनेमात आयटम साँग करताना दिसणार आहे