Photos: घेरदार पिवळा लेहेंगा, कानात झुमके; संजीदा शेखचं सुंदर फोटोशूट चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2024 18:30 IST2024-05-15T18:02:08+5:302024-05-15T18:30:17+5:30

अभिनेत्री संजीदा शेख तिच्या जबरदस्त अभिनयासाठी ओळखली जाते.
अभिनयाबरोबरच ती सोशल मीडियावरही सक्रिय असल्याचं पाहायला मिळते.
सध्या अभिनेत्री संजय लीला भन्साळींच्या 'हीरामंडी' या वेबसिरीजमुळे चर्चेत आहे.
'हीरामंडी' सीरिजमध्ये अभिनेत्रीने वहीदा नावाच्या तवायफ महिलेची भूमिका साकारली आहे.
अभिनेत्रीने आता सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहे. या फोटोंवर चाहत्यांच्या कमेंट आणि लाइक्सचा अक्षरशः पाऊस पडताना दिसत आहे.
पिवळ्या रंगाच्या लेहेंगा आणि त्यावर मॅचिंग झुमके असा पारंपरिक पेहराव करत तिने हे फोटोशूट केलंय.
या फोटोंमध्ये ती प्रचंड सुंदर दिसत आहेत. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या लूकची चर्चा रंगली आहे. संजीदाची ही स्टाईल तिच्या चाहत्यांना वेड लावत आहे.
नॅचरल मेकअप आणि बांधलेल्या केसांमध्ये संजीदा शेख हिचं सौंदर्य फुलून दिसत आहे. तिच्या या लूकनं चाहत्यांना घायाळ करत त्यांच्या मनाचा ठाव घेतला आहे.
'हीरामंडी' या सीरिजआधी संजीदा शेख ही अभिनेता हृतिक रोशन आणि दीपिका पादुकोणसोबत 'फायटर' सिनेमामध्ये महत्त्वाच्या भूमिकेत झळकली होती.
संजीदा शेख हिने अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं.