टीव्ही इंडस्ट्रीला वैतागली होती 'ही' अभिनेत्री, एकता कपूर झालेली नाराज; आता बॉलिवूडमध्ये यशस्वी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2023 12:42 PM2023-05-03T12:42:56+5:302023-05-03T13:00:18+5:30

'या' अभिनेत्रीला दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे.

'मेरी आशिकी तुम से ही' या कलर्सवरील मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री राधिका मदनने (Radhika Madan) दोन दिवसांपूर्वीच 28 वा वाढदिवस साजरा केला. टीव्ही ते सिनेमा असा तिचा यशस्वी प्रवास राहिला आहे. बॉलिवूडमध्ये तिने आपला जम बसवायला सुरुवात केली आहे.

टीव्ही इंडस्ट्री सोडल्यानंतर राधिकाने आतापर्यंत काही हिंदी सिनेमात काम केलं आहे. 'पटाखा' सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

तसंच दिवंगत अभिनेते इरफान खान यांच्यासोबत तिला 'अंग्रेजी मिडियम' सिनेमात काम करण्याची संधी मिळाली. यातील तिच्या भूमिकेचं विशेष कौतुक झालं. याशिवाय तिने 'शिद्दत', 'कुत्ते' या चित्रपटांमध्येही काम केलं आहे.

सुशांतसिंह राजपूतप्रमाणेच राधिकानेही बॉलिवूडमध्ये नाव कमावलं आहे. तिचे या क्षेत्रातील अनेक कलाकारांसोबत चांगले संबंध आहेत. मात्र तिने टीव्ही इंडस्ट्री का सोडली असा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता. यावर तिने तिखट शब्दात उत्तर दिलं होतं.

टीव्ही इंडस्ट्रीत ४० ते ५० तास काम करावं लागतं. ते फारच थकावणारं शेड्युल असतं. स्क्रिप्टविषयी विचारलं तर सांगण्यात येतं की तुम्ही सेटवर या गरमागरम स्क्रीप्ट येत आहे. पण असं होत नाही आणि दिग्दर्शक आयत्या वेळी सीनमध्ये बदल करतात. तिथे काम करण्यात मी खूश नव्हते म्हणून मी दूर गेले असं ती म्हणाली होती.

राधिकाने केलेल्या या टिप्पणीनंतर अनेकांनी तिच्यावर नाराजी दर्शवली. टेलिव्हिजन क्वीन एकता कपूर ते सायंतनी घोष या अभिनेत्रीने नाराजी व्यक्त केली. ज्या इंडस्ट्रीमुळे तिच्या करिअरला सुरुवात झाली ही त्याच इंड्स्ट्रीबद्दल वाईट शब्द बोलत आहे.

इतक्या कमी वयात राधिकाला अनेक अवॉर्ड्स मिळाले आहेत. 2021 मध्ये तिने 'दादासाहेब फाळके पुरस्कार' पटकावला. अंग्रेजी मिडियम सिनेमातील भूमिकेसाठी तिला या पुरस्काराने गौरवण्यात आले होते. याशिवाय 2022 मध्ये तिला 'पीपल्स बेस्ट चॉईस अवॉर्ड'ही मिळाला.

राधिकाला या इंडस्ट्रीत १० वर्ष पूर्ण झाली आहेत. लवकरच ती एका वेबसिरीजमध्येही दिसणार आहे. फिल्मसोबतच तिने ओटीटी क्षेत्रातही नाव कमावले आहे.