किती सुंदर दिसतेय! केसात गजरा अन् साऊथ इंडियन साडी नेसून अभिनेत्री पूजाने केलेल्या फोटोशूटची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 10:32 IST2026-02-20T10:04:50+5:302026-02-20T10:32:42+5:30

एरवी अभिनेत्री बोल्ड आणि हॉट फोटोशूट सर्वांचं लक्ष वेधून घेतात. पण एका अभिनेत्रीने अत्यंत सुंदर पारंपरिक फोटोशूट करुन सर्वांचं मन जिंकलंय.

एरवी अभिनेत्री बोल्ड आणि हॉट फोटोशूट सर्वांचं लक्ष वेधून घेतात. पण एका अभिनेत्रीने अत्यंत सुंदर पारंपरिक फोटोशूट करुन सर्वांचं मन जिंकलंय.

ही अभिनेत्री आहे पूजा हेगडे. नुकतेच पूजाने तिचे काही नवीन फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोत पूजा कमालीची सुंदर दिसतेय.

कोणताही भडक मेकअप किंवा जड दागिने न वापरता पूजाने आपला लूक अत्यंत साधा पण सुंदर ठेवला आहे. तिची ही स्टाईल चाहत्यांना भावली आहे.

पूजाने खास साऊथ इंडियन स्टाईलची पांढऱ्या आणि लाल रंगाचं मिश्रण असलेली साडी नेसली आहे. पूजाने केसात गजराही माळलेला दिसतोय. पूजा या लूकमध्ये खूप सुंदर दिसतेय.

पूजाचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. "नैसर्गिक सौंदर्य कशाला म्हणतात, हे पूजाकडे पाहून समजते," अशा कमेंट्स नेटकरी करत आहेत.

पूजा हेगडेच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर, ती २०२५ मध्ये रिलीज झालेल्या कुली सिनेमातील मोनिका गाण्यामुळे चांगलीच प्रसिद्धीझोतात आली. पूजाच्या आगामी प्रोजेक्टबद्दल अद्याप कोणतीही अपडेट नाही.

पूजाने केलेलं हे लेटेस्ट फोटोशूट सोशल मीडियावर ट्रेंडिंग असून, 'स्टाईल आयकॉन' म्हणून तिने पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध केले आहे.