न्यूड सीन देण्याआधी दिग्दर्शकाने अभिनेत्रीला पाजलेली ड्रिंक; म्हणाली, "७ रिटेक्स घ्यायला लावले.."
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 12:28 IST2025-05-07T12:10:35+5:302025-05-07T12:28:12+5:30
अभिनेत्री म्हणाली, "मला तो सीन केल्यानंतर अजिबात पश्चात्ताप वाटत नाही.."

सिनेमा, वेब सीरिजमध्ये कलाकारांनी बोल्ड, इंटिमेट सीन्स देणं आता काही नवीन नाही. ओटीटीविश्वात तर अनेक कलाकार हे सीन्स देतात.
एका अभिनेत्रीला तर चक्क न्यूड सीन देण्याआधी दिग्दर्शकाने ड्रिंक करायला लावली होती. कोण आहे ती अभिनेत्री? आणि नक्की काय आहे तो किस्सा वाचा.
ही अभिनेत्री आहे कुब्रा सैत. कुब्राने 'सेक्रेड गेम्स' सीरिजमध्ये नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत इंटिमेट सीन दिले होते. तसंच यात तिची ट्रान्सजेंडरची भूमिका होती.
टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत कुब्रा म्हणालेली की, "मी शोसाठी ऑडिशन दिली तेव्हाच मला सांगण्यात आलेलं की मला न्यूड सीनही द्यावा लागणार आहे. सीन योग्य काळजी घेऊन शूट केला जाईल अशीही कल्पना दिली होती."
"जेव्हा टीम चांगली असते तेव्हा काहीही चुकीचं घडत नाही. अनुरागने मला शूटआधी ड्रिंकही पाजली होती. ७ वेळा तो सीन रिटेकही झाला होता. प्रत्येक टेकनंतर अनुराग येऊन माझी माफी मागायचा."
"तो मला येऊन म्हणायचा की सॉरी मी तुला हे सतत करायला सांगत आहे. प्लीज या सीनमुळे माझ्याबद्दल मनात राग धरु नको. मला फक्त सीन परफेक्ट हवा आहे म्हणून मी हे करायला सांगत आहे."
"मला हा सीन केल्याचा अजिबात पश्चात्ताप वाटत नाही. हा सीन करताना सेटवर मोजकेच लोक होते. सीन संपल्यानंतर मी थोडी भावनिक झाले होते. मात्र अनुरागसोबत काम करण्याचा मला चांगला अनुभव मिळाला."