ब्युटी विथ ब्रेन! मिस इंडिया, अभिनेत्री ते थेट पायलट अन् फॉर्म्युला कार रेसर; गुल पनागबद्दल वाचा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2024 01:06 PM2024-01-03T13:06:30+5:302024-01-03T13:24:03+5:30

'डोर' सिनेमातील अभिनेत्री गुल पनागविषयी या गोष्टी माहितीयेत का?

बॉलिवूड अभिनेत्री गुल पनाग (Gul Panag) आज ४५ वा वाढदिवस साजरा करत आहे. गुल पनागची ओळख केवळ अभिनेत्री नसून ती अनेक गोष्टीत तरबेज आहे. 1999 साली तिने मिस इंडियाचा किताब पटकावला आणि 2003 साली तिने सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं.

गुल पनागचे वडील आर्मीमध्ये होते. वडिलांच्या पोस्टिंगमुळे गुल पनागने १४ वेगवेगळ्या शाळांमधून शिक्षण पूर्ण केलं. नंतर तिने पंजाब विद्यापिठातून मॅथेमॅटिक्समध्ये पदवी घेतली आणि पॉलिटिकल सायन्समध्ये मास्टर्सपर्यंतचं शिक्षण घेतलं.

1999 साली मिस इंडियाचं विजेतेपद पटकावल्यानंतर ती प्रकाशझोतात आली. मिस ब्युटीफुल स्माईल हे टायटलही तिला मिळालं. त्याच वर्षी तिने युनिव्हर्स ब्युटी पेजेंटमध्येही सहभाग घेतला.

2003 साली गुल पनागने 'धूप' या सिनेमातून पदार्पण केलं. नंतर ती 'डोर','रन','हॅलो डार्लिंग','स्टुडेंट ऑफ द इयर 2' आणि नुकत्याच आलेल्या 'झ्विगॅटो' सिनेमात दिसली.

अभिनेत्रीसोबतच गुल पनाग मॅराथॉन रनर, बाईकर, फॉर्म्युला वन कार रेसर आणि सर्टिफाईड पायलटही आहे. तिने स्पेनच्या कॅटेलोनियामधील सर्किट डी कॅलाफाईट महिंद्रा रेसिंगच्या नव्याकोऱ्या M4Electro मध्ये रेसिंग ट्रॅकवर डेब्यू केला होता.

इतकंच नाही तर ती राजकारणातही सक्रीय आहे. 2014 साली तिने आम आदमी पक्षाकडून चंदीगढमधून निवडणूक लढवली होती. यामध्ये ती तिसऱ्या स्थानावर आली तर किरण खेर यांनी निवडणूक जिंकली होती.

2011 साली गुल पनागने बॉयफ्रेंड ऋषि अत्रीसह लग्न केले. तिने लग्नात बाईकवर एन्ट्री घेतली होती. यावरुनच तिला कार, बाईक्सची किती क्रेझ आहे हे समजतं.

तिचे पती ऋषि हे पायलट आहेत. 2018 मध्ये त्यांना एक मुलगा झाला. त्याचं नाव निहाल आहे.

गुल कर्नल शमशेर सिंह फाऊंडेशन हे एनजीओ चालवते. लैंगिक समानता, शिक्षण आणि आपत्ती व्यवस्थापन या विषयांवर काम करतं. तिने इंडिया अगेन्स्ट करप्शन आंदोलनातही सहभाग घेतला होता.

एकंदर गुल पनागचं आयुष्य बघता ती खऱ्या अर्थाने ब्युटी विथ ब्रेनचं उदाहरण आहे असं म्हणायला हरकत नाही.