सेटवर 'ती' चूक पडली महागात! अभिनेत्रीला आईने बेदम मारलंच अन् दिग्दर्शकानेही कानाखाली लगावली

By देवेंद्र जाधव | Updated: July 8, 2025 17:05 IST2025-07-08T16:54:51+5:302025-07-08T17:05:23+5:30

सध्या बॉलिवूडमध्ये लोकप्रिय असलेल्या एका सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या हातून चूक घडल्याने तिला दिग्दर्शक आणि आई-वडिलांचा मार खावा लागला होता. काय घडलं होतं नेमकं?

बॉलिवूडच्या पिटाऱ्यात अनेक किस्से सापडतात. हा रंजक किस्सा अशाच एका सिनेमाच्या सेटवर घडलेला. हा सिनेमा म्हणजे 'चाची ४२०'. कमल हासनचा हा सिनेमा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचा फेव्हरेट सिनेमा

या सिनेमात सध्याची बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री फातिमा सना शेखने काम केलं होतं. फातिमा तेव्हा खूप लहान होती. तिने कमल हासनच्या लेकीची भूमिका साकारली होती.

कमल हासनसाठी या सिनेमात भरपूर मेकअपची गरज असायची. त्यामुळे त्याच्यासाठी खास मेकअप आर्टिस्ट यायचा. हा आर्टिस्ट एक मोठा डबा घेऊन सेटवर यायचा.

फातिमा तेव्हा फक्त ४ वर्षांची होती. एकदा तिने मेकअप बॉक्स उघडला. बॉक्स उघडताच तिला आतमध्ये असलेले सर्व रंग दिसले. निरागस फातिमाने सर्व रंग एकमेकांमध्ये मिक्स केले.

जेव्हा कमल हासनवर मेकअप करायची वेळ आली तेव्हा सर्व मेकअपचं सामान आणि रंग अस्ताव्यस्त झाले होते. फातिमाने हे केलंय असं समजताच तिला खूप ओरडा मिळाला.

इतकंच नव्हे 'चाची ४२०'च्या साहाय्यक दिग्दर्शकाने फातिमाच्या कानाखाली लगावली. जेव्हा फातिमाच्या घरी ही गोष्ट समजली तेव्हा आई-बाबांकडूनही तिला मार खावा लागला.

पण कमल हासनने हे प्रकरण शांत केलं. फातिमा लहान असल्याने तिने नकळतपणे असं केलं असं अभिनेत्याने सर्वांना समजावलं. अशाप्रकारे फातिमाने हा रंजक किस्सा एका पॉडकास्टमध्ये सांगितला.