अजय देवगणची हिरोईन, पहिल्या घटस्फोटानंतर पुन्हा प्रेमात पडली; डेटिंगदरम्यानच झाली प्रेग्नंट
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 14:20 IST2025-05-20T14:08:56+5:302025-05-20T14:20:51+5:30
डेटिंगवेळीच झाली प्रेग्नंट, घाईघाईत केलं लग्न

अमाला ३३ वर्षांची असून तिचा लग्नानंतर ३ वर्षातच तिचा घटस्फोट झाला होता. यानंतर ती पुन्हा रिलेशनशिपमध्ये आली. दुसऱ्या लग्नाआधीच ती गरोदरही राहिली. नुकतंच तिने प्रेग्नंसीवर मोकळेपणाने संवाद साधला.
मनोरंजनविश्वात असे अनेक सेलिब्रिटी आहेत जे प्रोफेशनलपेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळेच जास्त चर्चेत असता. लग्न, रिलेशनशिप, संसार, मुलं, घटस्फोट या गोष्टींमुळे ते प्रसिद्धीझोतात राहिले.
'भोला' या अजय देवगणच्या सिनेमात दिसलेली अभिनेत्री आठवतेय का? अमाला पॉल (Amala Paul) असं तिचं नाव आहे. अमाला पॉल दाक्षिणात्य अभिनेत्री असून ती वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते.
JWF बिंजशी बोलताना अमला म्हणाली, "मला आयुष्यात आता काय करायचं आहे अशा संभ्रमात असताना मी गरोदर राहिले होते. पण या अनुभवामुळे मला उलट नवी दिशाच मिळाली आणि मी आणखी चांगली व्यक्ती बनले."
"माझ्या पोटात वाढणाऱ्या त्या जीवासाठीच आता माझं आयुष्य आहे अशी मला जाणीव झाली. माझ्यातला मी पणा नष्ट झाला."
तो काळच असा होता जेव्हा मी मोठ्या कठीण प्रसंगांना तोंड देत होते. २०२०-२१ पासून माझा वाईट काळ सुरु झाला होता. माझ्या वडिलांचं निधन झालं. मी दिशाहीन झाले होते.
"नंतर मला कोरोना झाला. त्याचवेळी सिजोफ्रेनियाचे लक्षणही जाणवले. मी माझ्या कुटुंबातल्या सदस्यांची नावंही विसरायचे. मी सोलो ट्रीप करायला लागले आणि माझी मला पुन्हा गवसले."
"जगत देसाईसोबत मी रिलेशनशिपमध्ये होते. डेटिंगला काहीच महिने झाले असता मी गरोदर असल्याचं मला कळलं. नंतर आम्ही लग्न केलं. जगत माझ्या आयुष्यात असणं हे माझं सौभाग्यच आहे."