कधीकाळी आंबे विकायचा हा अभिनेता, आज आहे कोट्यधीश अन् अमिताभ बच्चन यांचा जावई; ओळखा कोण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2024 05:47 PM2024-01-25T17:47:43+5:302024-01-25T17:54:39+5:30

एका सिनेमाने रातोरात झाला स्टार, आलिया भटसोबतही केलंय काम

अभिनेता किंवा अभिनेत्री व्हायचं स्वप्न उराशी बाळगून कोण किती स्ट्रगल करुन आलंय सांगता येत नाही. आज कोणी यशस्वी झालंय तर कोणी अजूनही स्ट्रगल करत आहे. असाच एक अभिनेता आहे जो हाँगकाँगमध्ये आंबे निर्यात करायचा तो आज मोठा स्टार आहे.

या अभिनेत्याचं नाव आहे कुणाल कपूर. 'रंग दे बसंती' सिनेमामुळे प्रसिद्धीझोतात आलेला कुणालने इंडस्ट्रीत येण्याआधी मोठा संघर्ष केला आहे. मात्र आज तो अभिनेता तर आहेच शिवाय एका नावाजलेल्या कंपनीचा मालक आहे आणि महानायक अमिताभ बच्चन यांचा जावईही आहे.

कुणाल कपूर केवळ १८ वर्षांचा असताना हाँगकाँगला आंब्यांची निर्यात करायचा हे खूप कमी जणांना माहित आहे. सिझनमध्ये त्याचा आंब्यांचाच मुख्य व्यापार होता. त्यातून त्याची डॉलरमध्ये भरघोस कमाईही व्हायची. पण कुणालचं कायम अभिनेता बनण्याचं स्वप्न होतं.

अभिनेता होण्यासाठी कुणालने नोकरीही सोडली. यानंतर त्याने असिस्टंट डायरेक्टर म्हणून करिअरला सुरुवात केली. बेरी जॉनकडे त्याने अभिनयाचं प्रशिक्षणही घेतलं. यानंतर त्याने नसिरुद्दीन शाह यांच्या थिएटर ग्रुप मोटलीमधअये सहभागी झाला.

अखेर तब्बूसोबत त्याने अभिनयात 'मीनाक्षी: द टेल ऑफ थ्री सिटीज' मधून पदार्पण केलं. मात्र त्याला खरी ओळख 2006 साली आलेल्या राकेश ओमप्रकाश मेहरांच्या 'रंग दे बसंती' मधून मिळाली.

'रंग दे बसंती'च्या यशानंतर कुणालने मागे वळून पाहिलं नाही. त्याने शाहरुख खानच्या 'डॉन'मध्ये छोटी भूमिका साकारली. यानंतर 'आजा नचले','बचना ऐ हसिनो','डियर जिंदगी' सारख्या काही सिनेमात त्याने काम केले.

केटो हे सर्वात प्रसिद्ध क्राईड फंडिंग प्लॅटफॉर्मबद्दल सर्वांना माहितच आहे. यामागे कुणाल कपूरचाच हात आहे. कुणालने बिझनेस पार्टनर जहीर अडेनवाला आणि वरुण शेठसोबत मिळून 2012 साली केटोची स्थापना केली. गरजू लोकांसाठी क्राऊड फंडिंग करायचं काम केटो करते.

आतापर्यंत कुणालच्या या कंपनीने 150 मिलियन डॉलर म्हणजेच 1249 कोटी रुपये गोळा केले आहेत. आलिशान जीवन जगणाऱ्या कुणालची एकूण संपत्ती तब्बल 166 कोटी रुपये आहे.

कुणाल कपूरचं अमिताभ बच्चन यांच्याशीही नातं आहे. अमिताभ यांचा सख्खा भाऊ अजिताभ बच्चन यांची लेक नैना बच्चनसोबत कुणालने लग्न केले आहे. त्यामुळे नात्याने कुणाल अमिताभ बच्चन यांचा जावई आहे. कुणाल आणि नैनाला एक मुलगाही आहे.