IN PICS : 7 वर्षांपासून कुठे गायब होता चंद्रचूर सिंग? स्वत: दिले उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2021 03:15 PM2021-05-23T15:15:15+5:302021-05-23T15:22:09+5:30

गेल्या वर्षी सुश्मिता सेनची लीड भूमिका असलेल्या ‘आर्या’ या वेबसीरिजमधून कमबॅक केले. पण इतकी वर्ष चंद्रचूर कुठे होता?

25 वर्षांपूर्वी चंद्रचूर सिंग याने ‘माचिस’ या सिनेमातून धमाकेदार डेब्यू केला. यानंतर अनेक सिनेमांत तो झळकला आणि बघता बघता गायब झाला. गेल्या वर्षी सुश्मिता सेनची लीड भूमिका असलेल्या ‘आर्या’ या वेबसीरिजमधून कमबॅक केले. पण इतकी वर्ष चंद्रचूर कुठे होता?

ुई-टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत चंद्रचूरने याचाही खुलासा केला आहे. गेली सात वर्षे चंद्रचूर कुठे होता तर मुलांच्या संगोपनात बिझी होता. त्याने खुद्द हा खुलासा केला.

त्याने सांगितले, मी एक सिंगल फादर आहे. त्यामुळे मुलांसाठी मला खूप वेळ हवा होता. त्यामुळे मी अधिकाधिक वेळ मुलांना देत होतो. एक चांगला अभिनेता असण्यासोबतच एक चांगला पिता बनणे मला त्याकाळात महत्त्वाचे वाटले, असे त्याने सांगितले.

चंद्रचूरने दिल क्या करे, दाग द फायर, जोश, क्या कहेना अशा विविध सिनेमात भूमिका साकारल्या. .

दिसायला स्मार्ट असलेल्या चंद्रचूडला सुरुवातीला चांगल्या चांगल्या भूमिका मिळाल्या. ‘तेरे मेरे सपने’ या सिनेमातून त्याने 1996 साली रुपेरी पडद्यावर एंट्री मारली. त्याच वर्षी त्याचा ‘माचिस’ हा सिनेमाही रिलीज झाला होता.

2000 साली मुंबईत बोटिंग करताना चंद्रचूर सिंहला अपघात झाला. या अपघातात त्याच्या दोन्ही खांद्यांना जबर दुखापत झाली होती. ही दुखापत इतकी गंभीर होती की त्यातून सावरण्यासाठी त्याला तब्बल 15 वर्षे लागले.

अपघातानंतर दुखापतीमधून सावरण्यासाठी त्याला त्याची सगळी कमाई खर्ची करावी लागली. या खचार्मुळे त्याची आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होऊ लागली. त्यामुळे चंद्रचूर सिंहला कोणतंही काम मिळेनासं झालं.

अर्थात यानंतरही चंद्रचुरने हिंमत सोडली नाही. ‘चार दिन की चांदनी’ या चित्रपटातून त्याने कमबॅक केले. पण त्याचा हा कमबॅक चित्रपट दणकून आपटला. पैशांसाठी या काळात चंद्रचूडने अनेक छोट्या मोठ्या भूमिका केल्यात. अगदी मिळेल ते काम स्वीकारले. पण त्याच्या करिअरची गाडी पुन्हा रूळावर येऊ शकली नाही.

The Reluctant Fundamentalist हा त्याचा अखेरचा सिनेमा होता. आता वेबसीरिजच्या माध्यमातून अभिनयक्षेत्रात कमबॅक केले आहे. चंद्रचुड आता खूपच बदलला आहे.