CM शिंदे ते मुकेश अंबानी! आमिरच्या लेकीच्या वेडिंग रिसेप्शनला कोण कोण आलं? पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2024 12:39 PM2024-01-14T12:39:27+5:302024-01-14T12:45:34+5:30

बॉलिवूड सेलिब्रिटी, राजकीय नेते अन् उद्योगपती! आयरा-नुपूरच्या वेडिंग रिसेप्शनचा अल्बम पाहा

बॉलिवूड अभिनेता आमिर खानची लेक आयरा खानने नुकतीच विवाहबंधनात अडकली आहे.

३ जानेवारीला कोर्ट मॅरेज केल्यानंतर नुपूर आणि आयराने १० जानेवारीला उदयपूरमध्ये ख्रिश्चन पद्धतीने विवाह केला.

लग्नानंतर आयरा आणि नुपूरचं मुंबईत वेडिंग रिसेप्शन पार पडलं. त्यांच्या रिसेप्शनला कलाविश्वाबरोबरच, राजकीय नेते आणि उद्योगपतींनीही हजेरी लावली होती.

आयरा-नुपूरच्या वेडिंग रिसेप्शनला बॉलिवूड अवतरलं होतं. धर्मेंद्र, कंगना रणौत,माधुरी यांनी खास अंदाजात रिसेप्शन पार्टीला हजेरी लावली.

हिमेश रेशमिया, सलमान खान, मृणाल ठाकूर यांनीही हजेरी लावली होती.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे पत्नी शर्मिला ठाकरे यांच्यासह आयरा-नुपूरच्या रिसेप्शनला आले होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही आमिर खानच्या लेकीच्या रिसेप्शनला हजेरी लावली होती.

तर उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांनी आयरा-नुपूरच्या रिसेप्शनमध्ये सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.

मिसेस उपमुख्यमंत्री अमृता फडणवीस यांनीही आयरा-नुपूरच्या रिसेप्सनला हजेरी लावली होती.

आकाश ठोसर - रिंकू राजगुरूने आमिरच्या लेकीच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये लाइमलाइटमध्ये होते.

रितेश देशमुख- जिनिलियानेही आयरा-नुपूरच्या रिसेप्सनला हजेरी लावली होती.