Sonakshi Sinha: BF सोबत डेट नाईटवरून येणाऱ्या सोनाक्षी सिन्हाचे रोमँटिक फोटो लीक, दिसला असा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2022 02:21 PM2022-09-16T14:21:18+5:302022-09-16T14:26:16+5:30

Sonakshi Sinha: बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा गेल्या बऱ्याच काळापासून जहीर इक्बालसोबतच्या तिच्या नात्यामुळे चर्चेत आहे. हल्लीच हे दोघेही आपल्या काही मित्रांसोबत डेट नाईटमध्ये स्पॉट झाले. या दोघांचेही काही फोटो लीक झाले आहेत.

सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल त्यांच्यातील नात्याबाबत संकेत देत असतात. आता त्यांच्या चाहत्यांना या दोघांच्या विवाहाची प्रतीक्षा आहे. यादरम्यान, त्यांच्या लेट नाईट पार्टीमधील काही फोटो समोर आले आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा गेल्या बऱ्याच काळापासून जहीर इक्बालसोबतच्या तिच्या नात्यामुळे चर्चेत आहे. हल्लीच हे दोघेही आपल्या काही मित्रांसोबत डेट नाईटमध्ये स्पॉट झाले. या दोघांचेही काही फोटो लीक झाले आहेत.

पार्टीमध्ये सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल एकमेकांसोबत प्रायव्हेट टाइम स्पेंड करताना दिसले. यादरम्यानचा फोटो अभिनेता वरुण शर्मा याने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. हा लीक फोटो खूप व्हायरल होत आहे. सोनाक्षी आणि जहीर त्यांचे फोटो एकमेकांसोबत पोस्ट करत असतात.

हॉटेलमधून बाहेर निघताना सोनाक्षी आणि जहीर यांनी पापाराझींना एकही पोझ दिली नाही. समोर आलेल्या फोटोंमध्ये तुम्ही सोनाक्षी तिच्या मैत्रिणीसोबत बाहेर येताना दिसत आहे. तर जहीर तिच्या मागून येत आहे.

सोनाक्षी सिन्हा यादरम्यान, व्हाईट कलरच्या स्लिट ड्रेसमध्ये खूप सुंदर दिसत आहे. त्याबरोबरच अभिनेत्री पूर्णपणे तिच्या मित्रांसोबत मस्ती करताना दिसत होती.

जहीर इक्बालबाबत बोलायचं झाल्यास तो पापाराझींना पाहताच आपला चेहरा लपवताना दिसला. मात्र त्याला सहजपणे ओळखता आलं. सोशल मीडियावर आता या डेट नाईटचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.