ऐन जवानीत पाकिस्तानीशी लग्न केले, संबंध बिघडताच भारतात येत या अभिनेत्रीने नाव बदलले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2023 18:44 IST2023-01-17T18:19:39+5:302023-01-17T18:44:19+5:30

प्रसिद्ध अभिनेत्री रीना रॉयचे आयुष्य खूप संघर्षमय होते. 70-80 च्या दशकातील रीना मोठ्या अभिनेत्री होत्या. एकेकाळी त्या पाकिस्तानी क्रिकेटर मोहसिन खानशी लग्न करून पाकिस्तानला गेल्या होत्या. लग्नाच्या 7 वर्षानंतर दोघांमध्ये घटस्फोट झाला तेव्हा रीना भारतात परतल्या.

प्रसिद्ध अभिनेत्री रीना रॉयचे आयुष्य खूप संघर्षमय होते. 70-80 च्या दशकातील रीना मोठ्या अभिनेत्री होत्या. एकेकाळी त्या पाकिस्तानी क्रिकेटर मोहसिन खानशी लग्न करून पाकिस्तानला गेल्या होत्या. लग्नाच्या 7 वर्षानंतर दोघांमध्ये घटस्फोट झाला तेव्हा रीना भारतात परतल्या.

रीना रॉय या 1980 च्या दशकात प्रसिद्ध अभिनेत्री होत्या. त्या त्यांच्या कारकिर्दीची निवड होती तेव्हा तिने पाकिस्तानी क्रिकेटर मोहसिन खानशी लग्न केले. मोहसीन हे देखील तेव्हाचे मोठे क्रिकेटपटू होते. पुढ काही दिवसांनी मोहसीननेही क्रिकेटला अलविदा केले.

घटस्फोट घेण्याअगोदर मोहसीन याने क्रिकेट सोडले होते. बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली होती.

रीना त्यावेळी पाकिस्तान सोडून भारतात आल्या होत्या. पण, तेव्हा त्यांच्या मुलीचा ताबा त्यांना मिळाला नव्हता.

आपल्या मुलीचा ताबा घेण्यासाठी रीना अनेक प्रयत्न करावे लागले. एका मुलाखतीमध्ये त्यांनी आपल्या मुलीचा ताबा घेण्यासाठी केलेले प्रयत्न सांगितले आहेत.

अखेर रीनाला तिच्या मुलीचा ताबा मिळाला आणि त्यानंतर तिच्या मुलीचे नाव 'जन्नत' बदलून 'सनम' केले. या सर्व गोष्टींनंतर, जेव्हा रीनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तिला यश मिळाले नाही आणि त्यानंतर तिने तिची मुलगी सनमसोबत मुंबईतच अभिनयाचे क्लासेस सुरू केले आणि बॉलिवूडपासून दुरावले.

रीना रॉयचे नाव देखील तीनदा बदलले आहे. रीनाचे पहिले नाव सायरा अली होते, पण जेव्हा रीनाच्या आईचा आणि तिच्या वडिलांचा घटस्फोट झाला तेव्हा तिच्या आईने तिचे नाव रूपा रॉय ठेवले.

जेव्हा तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले तेव्हा तिने तिचे नाव रूपा वरून बदलून रीना रॉय असे ठेवले.