प्रसिद्ध भारतीय क्रिकेटरसोबत जोडलं गेलं नाव, आता 'या' सुपरस्टारला डेट करतेय ही अभिनेत्री; कोण आहे ती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2024 16:32 IST2024-12-21T16:22:13+5:302024-12-21T16:32:26+5:30

बॉलिवूड अभिनेत्री तमन्ना भाटियाने तिच्या आजवरच्या फिल्मी करिअरमध्ये तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

'स्त्री-२' या चित्रपटातील तिच्या आयटम सॉंगनेही प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं. तसेच 'बाहुबली' चित्रपटातील तिची भूमिकाही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे.

सध्या तमन्ना भाटिया 'सिकंदर का मुकद्दर' या तिच्या चित्रपटामुळे चर्चेत आहे.

३४ वर्षीय तमन्ना भाटियाने केवळ साऊथ सिनेमातच नाही तर हिंदी सिनेमांमध्येही विशेष ठसा उमटवला आहे.

तमन्नाच्या शैलीने आणि अदांनी चाहत्यांची मन जिंकली आहेत. पण, अभिनेत्रीची तिच्या अभिनयापेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चा झाली.

दरम्यान, तमन्नाचं नाव प्रसिद्ध भारतीय क्रिकेटर विराट कोहलीसोबतही जोडलं गेलं होतं. ते दोघेही एकमेकांना डेट करत होते, अशा चर्चा देखील रंगल्या होत्या.

दाक्षिणात्य सिनेसृष्टीसह बॉलिवूड गाजवणारी तमन्ना लवकरच लग्न करणार असल्याचं सांगण्यात येतंय. तमन्ना अभिनेता विजय वर्मा डेट करत असल्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे.

२०२३ मध्ये, लस्ट स्टोरीज २ हा चित्रपट OTT वर प्रदर्शित झाला ज्यामध्ये विजय आणि तमन्ना एकत्र आले. त्यानंतर त्यांच्या लव्हस्टोरीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली.