एक हिट दिला अन् गायब झाली! 'मोहब्बतें'मधील 'ही' अभिनेत्री इंडस्ट्री सोडून सांभाळतेय कोट्यवधींचा व्यवसाय
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 15:54 IST2025-08-01T15:31:24+5:302025-08-01T15:54:04+5:30
पहिलाच सिनेमा ठरला हिट अन् झाली गायब! 'मोहबत्ते' मधील या अभिनेत्रीने इंडस्ट्रीला ठोकला रामराम? सांभाळतेय कोट्यवधींचा व्यवसाय

'मोहब्बतें' चित्रपटातून अभिनेत्री प्रीती झांगियानी बॉलिवूड इंडस्ट्रीत पदार्पण केलं. इतक्या वर्षांनंतरही या अभिनेत्रीला चाहते विसरलेले नाहीत.
२००० साली आलेल्या आपल्या करिअरमधील पहिल्याच चित्रपटातून ती प्रेक्षकांची मनं जिंकण्यात यशस्वी ठरली होती.
निखळ हास्य, सहज सुंदर अभिनयाच्या प्रेमात चाहते पडले होते. दरम्यान, १९९९ मध्ये 'माझविल्लू' या मळ्यालम चित्रपटामधून तिच्या करिअरची सुरुवात केली.
निखळ हास्य, सहज सुंदर अभिनयाच्या जोरावर तिने चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. दरम्यान, १९९९ मध्ये 'माझविल्लू' या मळ्यालम चित्रपटामधून प्रीतीने करिअरची सुरुवात केली.
मुंबईतील एका सिंधी कुटुंबात जन्मलेली प्रीती पहिल्यांदा 'ये है प्रेम' या म्युझिक अल्बममध्ये अभिनेता अब्बाससोबत दिसली. तसंच तिची 'छूई मुई सी तुम लगती हो' आणि 'कुडी जच गई' ही गाणी प्रचंड गाजली. यानंतर प्रीती निरमा साबण आणि इतर काही जाहिरातींमध्येही झळकली.
त्यानंतर तिने 'मोहब्बतें' या मल्टीस्टारर सिनेमातून लोकप्रियता मिळवली. शमिता शेट्टी, आदित्य चोप्रा, जिम्मी शेरगिल, जुंगल हंसराज, किम शर्मा, प्रिती झंगियानी असे अनेक कलाकार मोहब्बते सिनेमात होते.
'मोहब्बतें' या पहिल्याच सिनेमातून अभिनेत्रीचा प्रचंड स्टारडम मिळाला. त्यानंतर प्रीती 'आवारा पागल दिवाना' चित्रपटात दिसली. मात्र, तिच्या सिनेमाची प्रेक्षकांवर फारशी जादू चालली नाही.
त्यानंतर अभिनेत्रीच्या करिअरला उतरती कळा लागली. त्यानंतर प्रीतीने २००८ मध्ये मॉडेलशी लग्न केले मॉडेल आणि अभिनेता प्रवीण डबाससोबत लग्न केलं. शेवटची ती २०२० मध्ये आलेल्या 'द पुष्कर लॉज' या चित्रपटात ती शेवटची दिसली. ४३ वर्षीय अभिनेत्री दोन मुलांची असून ती तिच्या नवऱ्याचं प्रोडक्शन हाऊस चालवते. या माध्यमातून ती कोट्यवधींची कमाई करते.