"इन आँखों की मस्ती के मस्ताने हजारों हैं", अनारकली ड्रेसमध्ये दिशा पटानीचा नवाबी अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2024 16:08 IST2024-03-08T16:00:16+5:302024-03-08T16:08:51+5:30
दिशा पटानी चित्रपटांपेक्षा तिच्या हॉट आणि ग्लॅमरस स्टाईलमुळे अधिक चर्चेत असते.

आपल्या फिटनेस आणि हॉटनेसमुळे नेहमीच चर्चेत राहणारी बॉलिवूड अभिनेत्री म्हणजे दिशा पटानी. सध्या अभिनेत्रीने इंस्टाग्रामवर पुन्हा एकदा धमाल उडवून दिल्याचं पाहायला मिळतंय.
दिशा ही सोशल मीडियावर कायम सक्रीय असते. नुकतेच दिशाने तिचे खास फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
गोल्डन रंगाच्या अनारकली ड्रेसवर सोडलेले मोकळे केस तिच्या सौंदर्यात आणखी भर टाकत आहेत.
या फोटोंमध्ये दिशा पटानी आपल्या नवाबी लूकने सगळ्यांना घायाळ करत आहे. दिशा पटानीचे हे फोटो पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत.
दिशा सध्या तिच्या ' योद्धा २’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. लवकरच हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.
दिशा पटानीने २०१५ मध्ये अभिनेता वरुण तेज सोबत ‘लोफर’ या तेलुगू चित्रपटातून तिच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. या सिनेमाच्या माध्यमातून तिने मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं.
आता अभिनेत्रीने दिग्दर्शनात पदार्पण केलं आहे. 'क्यों करुं फिकर' या म्यूझिक व्हिडीओचं दिग्दर्शन दिशाने केलं आहे. दिशा लवकरच 'कल्कि २८९८ एडी' या सिनेमात झळकणार आहे.
दिशाने ‘बागी २’, ‘भारत’, ‘मलंग’, ‘राधे’ आणि ‘एक व्हिलन रिटर्न्स’ यांसारख्या हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं आहे.