किडनीच्या त्रासामुळे आई होऊ शकत नाही अभिनेत्री, लग्नानंतर १६ वर्षांनंतरही मूल नाही, बोलून दाखवलेली खंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 17:48 IST2025-11-04T17:43:33+5:302025-11-04T17:48:15+5:30

लग्नानंतर १६ वर्षांनंतरही अभिनेत्रीला मूल नाही. एकच किडनी असल्याने अभिनेत्री आई होऊ शकत नाही.

अनेक हिंदी मालिका आणि सिनेमांमध्ये काम करून बॉलिवूडमध्ये ठसा उमटवणारी अभिनेत्री म्हणजे मराठमोळी अश्विनी काळसेकर. अश्विनीने २००९ साली बॉलिवूड अभिनेता मुरली शर्मासोबत लग्नगाठ बांधली.

मात्र लग्नानंतर १६ वर्षांनंतरही या जोडप्याला मूल नाही. याबद्दल अश्विनीने एका मुलाखतीत खंत व्यक्त केली होती.

आई होण्याची इच्छा असूनही स्वत:चं मूल नसण्याबाबत अभिनेत्री व्यक्त झाली होती. किडनीच्या त्रासामुळे आई होऊ शकत नसल्याचा खुलासा अश्विनीने एका मुलाखतीत केला होता.

अश्विनीने सांगितलं होतं की "खरं सांगायचं तर आम्ही प्रयत्न केला पण मी म्हटल्याप्रमाणे मला किडनीचा त्रास होता आणि त्यावेळी सरोगसीची फॅशन नव्हती. आमच्याकडे इतके पैसेही नव्हते".

"आम्ही सेटल होत होतो, धडपडत होतो. पुन्हा प्रयत्न केला. पण, एका क्षणी डॉक्टर म्हणाले की तुमची किडनी भार उचलू शकणार नाही. त्यामुळे तुम्ही स्वतःचे किंवा मुलाचे नुकसान कराल आणि मग ते होऊ शकले नाही".

"मला मूल होऊ शकले नाही. खरंतर हा नशीबाचा भाग आहे. वाईट तर वाटते. मला पूर्ण वर्तुळात जगायचे आहे पण ते शक्य झाले नाही".

"कदाचित मला माझ्या सासू सासऱ्यांची आणि आई-वडिलांची सेवा करायची होती आणि ते आमच्यासोबत आहेत, म्हणून मी ते करत आहे", असं अश्विनी म्हणाली होती.

अश्विनीला लहानपणापासून एकच किडनी आहे. आई होऊ शकत नसल्याने अश्विनीने घरात दोन श्वान पाळले आहेत. त्यांनाच ती तिची मुलं मानते.