११४ कुत्रे पाळणारा बॉलिवूडमधील श्रीमंत अभिनेता, एकूण संपत्ती ४०० कोटींच्या घरात

By देवेंद्र जाधव | Updated: April 28, 2025 15:29 IST2025-04-28T14:52:05+5:302025-04-28T15:29:58+5:30

या बॉलिवूड अभिनेत्याकडे आहेत तब्बल ११४ कुत्रे आहेत. गेली अनेक वर्ष हा अभिनेता बॉलिवूडवर त्याच्या अभिनयाची छाप पाडतोय. कोण आहे हा अभिनेता? जाणून घ्या

कोणाला गाड्यांचा शौक असतो, कोणाला घड्याळांचा, कोणाला डिझायनर बूटांचा. परंतु बॉलिवूडमधील एका अभिनेत्याला कुत्रे पाळण्याचा शौक आहे. हा अभिनेता कोण?

या अभिनेत्याचं नाव आहे मिथुन चक्रवर्ती. मिथुन चक्रवर्तींकडे एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १०० हून जास्त कुत्रे आहेत.

मिथुन चक्रवर्तींचे त्यांच्या कुत्र्यांसोबतचे अनेक फोटो दिसून येतात. मिथुन यांच्या मढ आयलंडवरील बंगल्यावर तब्बल ३६ कुत्रे आहेत.

याशिवाय मिथुन यांचा ऊटीमध्ये एक बंगला आहे. या बंगल्यावर मिथुन यांनी ३८ कुत्रे पाळले आहेत. त्यामुळे मिथुन यांच्याकडे १०० हून जास्त कुत्रे आहेत.

मिथुन चक्रवर्ती यांनी गेली अनेक वर्ष बॉलिवूडमध्ये विविध सिनेमांमधून अभिनय केलाय. मिथुन यांची स्टाईल, डान्सचे अनेकजण चाहते आहेत.

१९७६ साली मिथुन चक्रवर्ती यांनी 'मृगया' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. मिथुन चक्रवर्ती गेली ४९ वर्ष निरनिराळ्या भूमिकांमधून बॉलिवूड गाजवत आहेत

मीडिया रिपोर्टनुसार मिथुन चक्रवर्ती यांची नेटवर्थ ४०० कोटींच्या घरात आहे. मिथुन हे अभिनयक्षेत्रात सक्रीय असले तरीही त्यांचा लक्झरी हॉटेलचा व्यवसाय आहे.