या डोळ्यांची दोन पाखरं...! वेड लावतील गौतमी देशपांडेचे हे ब्लॅक अॅण्ड व्हाईट फोटो...!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2021 21:14 IST2021-05-07T21:03:54+5:302021-05-07T21:14:50+5:30
‘माझी होशील ना’ या मालिकेतील सई अर्थात गौतमी देशपांडे हिच्या फोटोंनी सध्या चाहत्यांना जणू वेड लावले आहे.

‘माझी होशील ना’ या मालिकेतील सई अर्थात गौतमी देशपांडे हिच्या फोटोंनी सध्या चाहत्यांना जणू वेड लावले आहे. (pics : gautamideshpandeofficial)
होय, गौतमीने स्वत:चे काही ब्लॅक अॅण्ड व्हाईट फोटो शेअर केलेत आणि ते पाहून चाहते तिच्या अक्षरश: प्रेमात पडलेत.
ये है रेशमी जुल्फों का अँधेरा न घबराइए, जहाँ तक महक है मेरे गेसुओं की चले आइये... असे लिहित गौतमीने हे फोटो शेअर केले आहेत.
अन्य काही फोटोंनाही तिने दिलेले कॅप्शन लक्षवेधी आहे. ‘या डोळ्यांची दोन पाखरे फिरतील तुमच्या भवती, पाठलाग ही सदैव करतील असा कुठेही जगाती,’ असे तिने लिहिले आहे.
तूर्तास तरी गौतमीच्या चाहत्यांनी या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
गौतमी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे़ आपल्या फॅन्ससोबत ती फोटो, व्हिडीओ शेअर करत असते.
‘माझा होशील ना’ या मालिकेमुळे गौतमी देशपांडेला चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. झी मराठीवरील माझा होशील ना या मालिकेतून गौतमी देशपांडे घराघरात पोहोचली.
गौतमी ही अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिची बहीण आहे. या शिवाय ती एक उत्तम गायिका आहे.
अनेक वेळा ती गाण्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. गौतमीला गाण्याचा वारसा तिच्या आजीकडून मिळाला आहे.