Nikki Tamboli Arbaz Patel Romantic Photoshoot: दो जिस्म, एक जान... 'बिग बॉस मराठी' फेम निक्की-अरबाझचं रोमँटिक फोटोशूट, पाहा Photos
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2024 15:37 IST2024-10-12T15:14:48+5:302024-10-12T15:37:44+5:30
Nikki Arbaz Romantic Photoshoot: Bigg Boss Marathi 5 मधील हॉट कपल निक्की तांबोळी आणि अरबाझ पटेल यांनी नुकताच एक रोमँटिक फोटोशूट केलाय.

Nikki Arbaz Romantic Photoshoot: Bigg Boss Marathi 5:
बिग बॉस मराठीचा पाचवा सिझन नुकताच संपला. या सिझनमध्ये निक्की तांबोळी आणि अरबाझ पटेल यांची हॉट & फिट कपल म्हणून चर्चा रंगली.
दोघे शो मध्ये आल्यापासूनच एकमेकांशी जवळीक साधताना दिसले. फॅमिली शो असलेल्या बिग बॉस मराठीमध्ये काही वेळा ही जोडी फारच इंटिमेट पोझमध्ये पाहायला मिळाली.
बिग बॉस मराठीचा सिझन संपला असला तरीही या दोघांची प्रेमरुपी मैत्री घराबाहेरही तशीच आहे. नुकताच या दोघांनी एक रोमँटिक फोटोशू़ट केला आहे.
अरबाझ बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर निक्की आणि त्याच्या नात्यात काही काळ दुरावा आला होता, पण अंतिम सोहळ्याआधी हा गैरसमज दूर झाला.
निक्की आणि अरबाझ बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतरही दोघे व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत डिनर डेटवर गेल्या नुकतेच दिसले होते.
त्यातच आता खऱ्या आयुष्यातही हॉट केमिस्ट्री असलेल्या जोडीचं नवं रोमँटिक फोटोशूट पाहून दोघांच्या रिलेशनशिपबद्दल अधिकच चर्चा रंगल्या आहेत. (सर्व फोटो सौजन्य- अरबाज, निक्की इन्स्टाग्राम)