1 वर्ष, 1 चित्रपट, 1 अफेअर, उद्ध्वस्त झालं करियर; 'या' अभिनेत्रीच्या सौंदर्याची चालली नाही जादू
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2024 15:56 IST2024-02-01T15:51:13+5:302024-02-01T15:56:10+5:30
सौंदर्य आणि अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं होतं. तिच्या अदांनी चाहते घायाळ व्हायचे.

बारबरा मोरी आज बॉलिवूडमध्ये दिसत नसली तरी एक काळ असा होता जेव्हा बॉलिवूडचे सुपरस्टार तिच्या प्रेमात पडायचे. बारबराने आपल्या सौंदर्य आणि अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं होतं. तिच्या अदांनी चाहते घायाळ व्हायचे.
हृतिक रोशनच्या 'काइट्स' चित्रपटामधून बारबराने चित्रपटांच्या दुनियेत प्रवेश केला. तिचा पहिला चित्रपट जरी प्रेक्षकांना फारसा प्रभावित करू शकला नसला तरी सौंदर्यामुळे ती खूप चर्चेत आली होती.
‘काइट्स’ हा बारबरा मोरीचा पहिला आणि शेवटचा चित्रपट ठरला. हा चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर ती कायमची स्पेनला गेली. आता ती तिथे राहते. बॉलिवूडमधील एका अफेअरने तिचं करिअर उद्ध्वस्त केलं असं म्हटलं जातं.
बारबरा मोरीवर घर तोडल्याचा आरोप आहे. 'काइट्स'च्या शूटिंगदरम्यान ती विवाहित हृतिक रोशनच्या जवळ आली होती. 2010 मध्ये त्यांच्या अफेअरबद्दल बरीच चर्चा रंगली होती.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'काइट्स' चित्रपटातील हृतिक आणि बार्बरा यांची ऑन-स्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडली नसली तरी त्यांच्या ऑफ-स्क्रीन केमिस्ट्रीबाबत खूप चर्चा होती. ही माहिती सुजॅनपर्यंत पोहोचली.
हृतिकच्या कंगनासोबतच्या अफेअरच्या बातम्यांमुळे सुजॅनआधीच नाराज होती. बारबरासोबतच्या हृतिकच्या अफेअरच्या बातम्यांमुळे हृतिक आणि सुजॅनमधील अंतर वाढलं होतं.
बारबरा मोरीचाही बॉलिवूडमध्ये भ्रमनिरास झाला. ती सर्व काही सोडून आपल्या देशात परतली. बारबरा आता बॉलिवूडपासून दूर मेक्सिकन चित्रपटांचा एक भाग आहे.
1996 मध्ये बारबरा मोरी अभिनेता सर्जियो मेयरसोबत रिलेशनशिपमध्ये होती. पण नंतर ते वेगळे झाले. 2016 मध्ये, बारबराने बेसबॉल खेळाडू केनेथ रे सिग्मनशी लग्न केले परंतु एका वर्षानंतर त्यांचा घटस्फोट झाला.