Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2025 16:39 IST2025-06-15T16:24:05+5:302025-06-15T16:39:25+5:30

Neha Marda : नेहा मर्दा पुन्हा एकदा पडद्यावर कमबॅक करण्याची तयारी करत आहे.

'बालिका वधू' या लोकप्रिय टीव्ही मालिकेत 'गेहना'ची भूमिका साकारणारी नेहा मर्दा पुन्हा एकदा पडद्यावर कमबॅक करण्याची तयारी करत आहे.

लग्नानंतर आणि आई झाल्यानंतरही नेहाने काम करणं थांबवलं. तिला मातृत्वाचा काळ एन्जॉय करायचा होता.

जेव्हा नेहा गरोदर होती, तेव्हा तिने स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचं प्लॅनिंग केलं होतं. टाइम्स ऑफ इंडिया टीव्हीशी बोलताना नेहाने याबाबत खुलासा केला.

नेहा म्हणाली- "मी कधीही विचार केला नव्हता की मी बिझनेसवुमन होईन. मी अजूनही १०-१२ तासांच्या नोकरीवर विश्वास ठेवते."

"मी एक अभिनेत्री आहे आणि मला तेच आवडते. तुम्ही तुमच्या सहकलाकारांसोबत तासनतास काम करता."

"तुम्ही कलाकरांकडून शिकता. तुम्ही कामगिरी आणि सादरीकरणावर लक्ष केंद्रित करता."

"मी ब्यूटी फिल्डमध्ये माझा व्यवसाय सुरू केला आहे. येत्या काही महिन्यात मी तुम्हासर्वांना एक गुडन्यूज देईन. मी काही गोष्टींबद्दल बोलेन."

"तुम्ही मला पुन्हा दररोज टीव्हीवर पाहाल. मी बऱ्याच काळापासून कामाला खूप मिस करत आहे."

"आई होणं हे खूपच सुंदर आहे पण मी एक अभिनेत्री असल्याचा आनंदही घेत आहे" असंही नेहाने म्हटलं आहे.