Arjun kapoor : मलायकासोबतच्या ब्रेकअपनंतर अर्जुन कपूर कोणाला करतोय डेट?, कॉमेडियनने सांगितलं सीक्रेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 12:30 IST2025-02-19T12:10:53+5:302025-02-19T12:30:03+5:30

Arjun kapoor And Malaika Arora : कॉमेडियन आणि अभिनेता हर्ष गुजरालने मलायकासोबतच्या ब्रेकअपनंतर अर्जुन कपूर खरोखरच आयुष्यात पुढे गेला आहे की तो अजूनही सिंगल आहे? याबाबत सांगितलं आहे.

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर हे एकेकाळी बी-टाउनमधील सर्वात लोकप्रिय कपल होतं. त्यांची केमिस्ट्री अनेकांना प्रचंड आवडायची.

जेव्हा अर्जुन कपूरने मलायकासोबत ब्रेकअप झाल्याची पुष्टी केली तेव्हा अनेक चाहते दु:खी झाले. मात्र ब्रेकअपनंतर मलायका आणि अर्जुन पुन्हा प्रेमात पडल्याची बातमी समोर आली आहे.

कॉमेडियन आणि अभिनेता हर्ष गुजरालने मलायकासोबतच्या ब्रेकअपनंतर अर्जुन कपूर खरोखरच आयुष्यात पुढे गेला आहे की तो अजूनही सिंगल आहे? याबाबत सांगितलं आहे.

'मेरे हसबंड की बीवी' या आगामी चित्रपटाच्या पत्रकार परिषदेत, चित्रपटातील कलाकारांनी लव्ह ट्रँगल आणि रिलेशनशिपबद्दल चर्चा केली.

अर्जुन कपूरच्या लव्ह लाईफवर हर्ष म्हणाला - अर्जुन भाई खऱ्या आयुष्यातही सिंगल आहे. आम्ही हे चित्रपटासाठी करत आहोत.

हर्ष गुजरालच्या विधानामुळे अर्जुन कपूर सध्या कोणालाही डेट करत नसल्याचं स्पष्ट झालं आहे. तो त्याच्या सिंगल आयुष्यात आनंदी आहे.

'मेरे हसबंड की बीवी'यात हर्ष गुजराल आणि अर्जुन कपूर यांच्यासोबत भूमी पेडणेकर आणि रकुल प्रीत सिंह मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट २१ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.