Anushka Sharma : अनुष्का शर्मा ११ वर्षांची असताना वडील लढलेले कारगिल युद्ध; घरी आईची असायची 'अशी' अवस्था

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2025 14:31 IST2025-05-10T14:25:17+5:302025-05-10T14:31:53+5:30

Anushka Sharma : वडील कारगिल युद्ध लढत असताना अनुष्का फक्त ११ वर्षांची होती.

बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री अनुष्का शर्मा ही आर्मी बॅकग्राऊंडमधून आली आहे. रिटायर्ड कर्नल अजय कुमार शर्मा हे तिचे वडील आहेत.

१९८२ नंतरचं प्रत्येक युद्ध ते लढले आहेत, ऑपरेशन ब्लूस्टार असो किंवा कारगिल युद्ध. वडील कारगिल युद्ध लढत असताना अनुष्का फक्त ११ वर्षांची होती.

अभिनेत्रीने २०१२ मध्ये दिलेल्या तिच्या जुन्या मुलाखतीत १९९९ मध्ये झालेल्या या युद्धात तिचे वडील लढल्याचा उल्लेख केला होता.

जेव्हा तिचे वडील घरी फोन करायचे. तेव्हा ती त्यांच्याशी तिचे बॉयफ्रेंड आणि शाळेबद्दल बोलत असायची. वडील युद्धक्षेत्रात आहेत हे तेव्हा तिला समजायचं नाही.

अनुष्काने ETimes शी बोलताना म्हटलं होतं की, "कारगिल युद्ध कठीण होतं. मी तेव्हा खूप लहान होते. पण आईला पाहून मला भीती वाटली."

"ती दिवसभर फक्त बातम्यांचे चॅनेल पाहत असे. जेव्हा जेव्हा कोणी मारलं गेल्याची घोषणा व्हायची तेव्हा ती अस्वस्थ व्हायची."

"एका आर्मी ऑफिसरची मुलगी असल्याचा अभिमान आहे. मी माझ्या वडिलांच्या खूप जवळ आहे" असंही अनुष्काने म्हटलं आहे.

८ मे रोजी अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर भारतीय हवाई दलाच्या शौर्याचं कौतुक केलं आहे.