'बॅड न्यूज'मध्ये झळकणार अनन्या पांडे, सिनेमात हे कलाकार दिसणार मुख्य भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2024 07:32 PM2024-05-08T19:32:22+5:302024-05-08T19:40:06+5:30

Ananya Panday : अभिनेत्री अनन्या पांडे पुन्हा एकदा पाहुण्या कलाकाराच्या रूपात प्रेक्षकांसमोर येणार आहे.

अभिनेत्री अनन्या पांडे बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

अभिनेत्री अनन्या पांडे पुन्हा एकदा पाहुण्या कलाकाराच्या रूपात प्रेक्षकांसमोर येणार आहे.

'रॉकी और रानी की प्रेमकहानी' चित्रपटातील 'हार्ट थ्रोब...' या गाण्यात अनन्याची झलक दिसली होती. त्यानंतर तिने 'ड्रीम गर्ल २'मध्ये परी आणि 'खो गए हम कहां'मध्ये आहना साकारली.

सध्या 'कंट्रोल' आणि 'शंकरा' या आगामी चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारत असलेली अनन्या 'बॅड न्यूज' चित्रपटासाठी पुन्हा पाहुणी कलाकार बनली आहे.

अनन्याने मागच्या महिन्यात जुहू येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये या चित्रपटासाठी चित्रीकरण केल्याचं समजतं.

या महिन्यात तृप्ती डिमरीसोबतचा सीन शूट केल्यानंतर अनन्याचं 'बॅड न्यूज'मधील काम पूर्ण होणार असल्याची माहिती मिळाली आहे.

धर्मा प्रोडक्शनची निर्मिती असलेल्या 'बॅड न्यूज'चं दिग्दर्शन आनंद तिवारी करत असून, विकी कौशल, तृप्ती डिमरी आणि अॅमी विर्क मुख्य भूमिकेत आहेत.

जुलैमध्ये हा चित्रपट प्रदर्शित करण्याची योजना आहे.