Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2025 16:19 IST2025-07-27T16:13:54+5:302025-07-27T16:19:27+5:30
Roshni Walia : रोशनी वालियाने तिच्या पर्सनल आयुष्यातील अनेक गुपितं उघड केली आहेत.

टीव्ही अभिनेत्री रोशनी वालिया लवकरच अजय देवगणच्या 'सन ऑफ सरदार २' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.
मोठ्या पडद्यावर येण्याआधी रोशनी वालियाने तिच्या पर्सनल आयुष्यातील अनेक गुपितं उघड केली आहेत.
हॉटरफ्लायशी झालेल्या संभाषणात, अभिनेत्रीने सांगितलं की, तिच्या पालकांचा घटस्फोट झाला आहे. ते आता एकत्र राहत नाहीत.
आईवडील एकमेकांच्या आयुष्यातून दूर गेले आहेत. वडिलांनी आईची साथ सोडली. आता वडिलांचं स्वतःचं एक वेगळं कुटुंब आहे.
आईचे कौतुक करताना रोशनी म्हणाली की, तिच्या आईने तिला प्रत्येक कठीण काळात साथ दिली आहे. तिची आईच तिचं कुटुंब आहे.
"आमचे कोणतेही नातेवाईक नाहीत, परंतु माझे आणि माझ्या आईचे काही मित्र-मैत्रिणी आता आमचं कुटुंब बनले आहेत."
"मला वाटतं की, रक्ताचं नातं आता फारसं महत्त्वाचं नाही. कधीकधी तुमचं नातं नॅचरली तयार होऊ शकतं आणि ते खूप चांगलं नातं असू शकतं."
"रक्ताचं नातं असायलाच हवं असं काही नाही. कधीकधी काही लोक देवदूत बनून येतात आणि नंतर ते तुमच्या आयुष्याचा एक भाग बनतात."
"आमचे आता कोणतेही नातेवाईक नाहीत. नातेवाईक आधी माझ्या आईची चेष्टा करायचे. माझी आई मुंबईत आल्यावर ते तिला टोमणे मारायचे."
"नातेवाईकांना माझ्या आईला शाप दिला की, ती कधीही यशस्वी होऊ शकणार नाही. पण आईने त्यावेळी मोठा निर्णय घेतला होता आणि आज आम्ही खूप आनंदी आहेत" असं रोशनीने म्हटलं आहे.