देवानंद, अमिताभ अन् आमिर खानसोबत झळकली; आता ८७ व्या वर्षी दिग्गज अभिनेत्री 'वाईल्डलाईफ फोटोग्राफी' करुन कमावतेय नाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2026 15:57 IST2026-01-18T15:44:35+5:302026-01-18T15:57:21+5:30
या अभिनेत्रीने हिंदी सिनेसृष्टीतील मोठ्या अभिनेत्यांसोबत काम केलंय. पण आता अभिनय क्षेत्रातून काहीशी बाजूला होत ही अभिनेत्री वाईल्डलाईफ फोटोग्राफीचा आनंद घेत आहे

हिंदी सिनेसृष्टीतील एक अशी अभिनेत्री जिने देवानंद, अमिताभ बच्चन ते आताच्या आमिर खानसोबत काम केलं. पण आज ही अभिनेत्री वाईल्डलाईफ फोटोग्राफर म्हणून नाव कमावत आहे.

ही अभिनेत्री आहे वहीदा रहमान. वहीदा यांनी सिनेसृष्टीतला एक काळ गाजवला आहे. पण आज त्या अभिनेत्री नाही तर वाईल्डलाईफ फोटोग्राफर बनून जंगलात भटकंती करत आहेत.

वहीदा रहमान यांना नेहमीच फिरण्याची आणि निसर्गाची आवड होती, पण आता त्यांनी कॅमेरा हातात घेऊन हे क्षण टिपायला सुरुवात केली आहे. अभिनयाचं क्षेत्र गाजवून त्या आपला छंद जोपासत आहेत.

आपल्या या आवडीसाठी वहीदा यांनी केवळ भारताच्या जंगलांचीच सफर केली नाही, तर त्या आफ्रिकेसारख्या दुर्गम भागातही जाऊन आल्या आहेत. तिथेही त्यांनी फोटोग्राफीची जादू अनुभवली आहे.

ताडोबा, बांधवगड आणि काझीरंगा यांसारख्या भारतातील प्रसिद्ध व्याघ्र प्रकल्पांपासून ते आफ्रिकेतील मसाई मारापर्यंत वहीदा रहमान यांनी प्रवास केला आहे.

वहीदा रहमान या आपल्याल्या शेवटच्या रंग दे बसंती आणि दिल्ली ६ या सिनेमात अभिनय करताना दिसल्या. उतारवयात वहीदा यांनी सिनेमात काम करणं कमी केलंय.

८७ व्या वर्षीही वहीदा रहमान यांची ही जिद्द आणि निसर्गाप्रती असलेले प्रेम आजच्या तरुण पिढीसाठी प्रेरणादायी ठरणारे आहे. एकूणच माणूस कोणत्याही वयात छंद जोपासू शकतो, हेच याचं उदाहरण आहे.

















