"लग्नानंतर सोहम त्याचं घर सोडून आलाय, त्यामुळे..."; बांदेकरांची सून पूजा बिरारी काय म्हणाली?
By देवेंद्र जाधव | Updated: December 21, 2025 12:11 IST2025-12-21T11:25:25+5:302025-12-21T12:11:32+5:30
पूजा बिरारीने सोहम बांदेकरशी लग्न केल्यानंतर आयुष्यात काय बदल घडला आहे, याबद्दल खुलासा केला आहे. काय म्हणाली अभिनेत्री?

अभिनेत्री पूजा बिरारी आणि अभिनेता सोहम बांदेकर यांचं काहीच दिवसांपूर्वी लग्न झालं. त्यांच्या लग्नाला सिनेसृष्टीतील तारे तारका उपस्थित होते.

सोहम आणि पूजा गेल्या काही महिन्यांपासून रिलेशनशिपमध्ये होते. अखेर दोघांनी त्यांचं नातं पुढे घेऊन जाण्याचा निर्णय घेतला आणि लग्न केलं.

लग्नानंतर आयुष्यात कसा बदल घडला? याबद्दल पूजाला एका मुलाखतीत विचारण्यात आलं. त्यावेळी पूजाने दिलेलं उत्तर चर्चेत आहे.

पूजा बिरारीने राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत हा किस्सा सांगितला. ती म्हणाली, लग्नानंतर मला फार काही बदललंय असं वाटत नाहीये.

पूजा पुढे म्हणाली, मी आधीपासूनच मुंबईत एकटी राहत होते. आता एक चांगली गोष्ट घडलीये की मला आयुष्यभरासाठी एक चांगला रुममेट मिळाला आहे. त्यामुळे मजा आहे.

माझ्याबाबतीत असे फार बदल घडले असं नाहीये. बदल घडले असतील तर बिचाऱ्या सोहमच्या बाबतीत घडले असतील. कारण तो त्याचं घर सोडून इथे आला आहे. त्यामुळे बदल काय असेल तर तो त्याच्यासाठी आहे, असंही पूजा म्हणाली.

पूजा आणि सोहम यांनी लग्नानंतर वेगळं राहण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे सोहमची आई आणि अभिनेत्री सुचित्रा बांदेकर यांनीच लेकाला हा सल्ला दिला होता.
















