मतदानाचं कर्तव्य पार पाडण्यासाठी ही अभिनेत्री चक्क न्यूझीलंडहून आली महाराष्ट्रात, म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2024 18:12 IST2024-11-21T18:06:00+5:302024-11-21T18:12:05+5:30
मराठमोळी अभिनेत्री मतदानाचं कर्तव्य पार पाडण्यासाठी थेट न्यूझीलंडहून महाराष्ट्रात आली.

राज्यभरात बुधवारी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडलं. मराठी कलाविश्वातील कलाकारांनी मतदानाचा हक्क बजावला.
मतदानाचं कर्तव्य पार पाडण्यासाठी एक मराठमोळी अभिनेत्री थेट न्यूझीलंडहून महाराष्ट्रात आली.
ती अभिनेत्री आहे गिरीजा ओक. न्यूझीलंडहून 32 तास प्रवास करून भारतात आली.
त्यानंतर पुन्हा चार-पाच तासांचा प्रवास करून पुण्यात पोहचली.
तिने शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील बाल शिक्षण मंदिर प्रशालेत आपला मतदानाचा हक्क बजावला.
गिरिजा मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
आतापर्यंत तिने हिंदी, मराठी मालिकांसह सिनेमा, वेबसीरिजमध्येही काम केलं आहे. त्यामुळे तिचा चाहतावर्ग कमालीचा मोठा आहे.
रंगभूमीवरही वेगवेगळे नाटकाचे प्रयोग करत तिने चाहत्यांच्या मनावर आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.
गिरीजाने शाहरुखसोबत 'जवान' सिनेमातही काम केलं आहे. या सुपरहिट सिनेमात शाहरुखच्या गर्ल गँगमधील एकीची भूमिका केली होती.
‘जवान’ आधी गिरीजा आमिर खानच्या ‘तारे जमीन पर’ या बॉलिवूड चित्रपटात झळकली होती.