कमाईच्या बाबतीतही आमिर आहे 'परफेक्ट'; आलिशान घर, लक्झरी कारसह इतकी आहे अभिनेत्याची Net Worth

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2022 13:12 IST2022-03-14T13:07:31+5:302022-03-14T13:12:45+5:30

Aamir khan: जाहिराती, चित्रपटांची निर्मिती, स्टेज परफॉर्मन्स यांच्या माध्यमातून आमिरची सर्वाधिक कमाई होते.

प्रत्येक चित्रपटाची चोखंदळपणे निवड करण्यामुळे अभिनेता आमिर खान बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शननिस्ट म्हणून ओळखला जातो. (photos : Avinash Gowariker instagram)

आजपर्यंत आमिरने वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारुन प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. त्यामुळे सोशल मीडियावर तो कायम चर्चेत असतो.

कोणत्याही कार्यक्रमांना उपस्थिती न लावणारा आमिर त्याच्या याच वेगळ्या शैलीमुळे कायम चर्चेत येतो. विशेष म्हणजे प्रत्येक गोष्टीत परफेक्ट असलेल्या या अभिनेत्याची एकूण संपत्ती किती असेल असाही प्रश्न अनेकांना पडतो.

caknowledge च्या माहितीनुसार, आमिरची एकूण संपत्ती १५६२ कोटी रुपये इतकी आहे.

आमिर महिन्याला साधारणपणे एका महिन्यात १० कोटी रुपये कमवतो. तर त्याचं वार्षिक उत्पन्न १२० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.

जाहिराती, चित्रपटांची निर्मिती, स्टेज परफॉर्मन्स यांच्या माध्यमातून आमिरची सर्वाधिक कमाई होते.

आमिर एका जाहिरातीसाठी साधारणपणे १०- १२ कोटी रुपये मानधन घेतो. तर चित्रपटासाठी ५० कोटी.

आमिरने २००९ मध्ये मुंबईमध्ये एक आलिशान घर खरेदी केलं आहे. या घराची किंमत १८ कोटी असल्याचं सांगण्यात येतं.

आमिरने अन्य प्रॉपर्टींमध्येही आर्थिक गुंतवणूक केली आहे.

आमिरकडे ९ लक्झरी कार आहेत. त्यांची किंमत १५ कोटींपेक्षा जास्त आहे. त्याच्या गाड्यांच्या ताफ्यामध्ये मर्सिडीज बेंझ, रॉल्स रॉज, फोर्ड यांसारख्या गाड्यांचा समावेश आहे.