"आम्ही कठीण प्रसंगातून जात आहोत...", भावाचं लग्न पुढे ढकलल्यानंतर पलक मुच्छलची प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 17:03 IST2025-12-04T17:02:41+5:302025-12-04T17:03:45+5:30
स्मृती आणि पलाशचं लग्न होणार की नाही?

"आम्ही कठीण प्रसंगातून जात आहोत...", भावाचं लग्न पुढे ढकलल्यानंतर पलक मुच्छलची प्रतिक्रिया
गेल्या काही दिवसांपासून भारतीय क्रिकेटपटू स्मृती मंधाना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांच्या लग्नाची चर्चा आहे. २४ नोव्हेंबर रोजी होणारा शाही विवाहसोहळा अचानक नाट्यमय पद्धतीने पुढे ढकलण्यात आला. आधी स्मृतीच्या वडिलांना हार्ट अॅटॅक आल्याची बातमी आली. नंतर पलाशने स्मृतीला धोका दिल्याचं समोर आलं. आता दोघांचं लग्न होणार की नाही यावर अजूनही प्रश्नचिन्हच आहे. दरम्यान यावर पलाश मुच्छलची बहीण पलकने प्रतिक्रिया दिली आहे.
'फिल्मफेअर'ला दिलेल्या मुलाखतीत पलक मुच्छल म्हणाली, "आमचं कुटुंब सध्या कठीण काळातून जात आहे. या प्रसंगी मी फक्त सकारात्मक राहण्यावर लक्ष देत आहेत. तसंच शक्य होईल तितकी सकारात्मकता परसवण्याचा आमचा प्रयत्न करत आहे आणि स्ट्राँग राहण्याकडे कल देत आहे."
पलक मुच्छलने प्रतिक्रिया देताना लग्नावर अपडेट दिलेलं नाही. त्यामुळे लग्न मोडलं आहे की नाही हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. एकंदर सर्व घडामोडी घडल्यानंतर स्मृती मंधाना अद्यापही समोर आलेली नाही. तर पलाश मुच्छल काही दिवसांपूर्वीच विमानतळावर दिसला होता. नंतर तो थेट वृंदावनात प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात गेला.
स्मृती आणि पलाश ७ डिसेंबरला लग्न करतील अशीही अफवा पसरली होती. त्यावर स्मृतीच्या भावाने प्रतिक्रिया देत याचं खंडन केलं. लग्न अजूनही पोस्टपोन असल्याचं तो म्हणाला. तर त्याआधी पलाशच्या आईने लग्न होणार अशी प्रतिक्रिया दिली होती. तर आता पललक मुच्छलच्या या प्रतिक्रियेनंतर आणखी संभ्रम निर्माण झाला आहे.