मराठी सिनेमे बघतोस का? तुला मराठीत काम करायला आवडेल का? शाहिद कपूर म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 18:09 IST2026-02-13T17:55:00+5:302026-02-13T18:09:21+5:30

"मराठी सिनेमे सुंदर असतात, पण..." शाहिद कपूरने स्पष्टच सांगितलं; मराठीत काम करण्यासाठी ठेवली 'ही' अट

O'romeo Shahid Kapoor On Marathi Movies Debut Learning Marathi Language | मराठी सिनेमे बघतोस का? तुला मराठीत काम करायला आवडेल का? शाहिद कपूर म्हणाला...

मराठी सिनेमे बघतोस का? तुला मराठीत काम करायला आवडेल का? शाहिद कपूर म्हणाला...

शाहिद कपूर हा बॉलिवूडमधला लोकप्रिय अभिनेता. सध्या तो 'ओ रोमिओ' चित्रपटामुळे चर्चेत आहे.  आज हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याचं पाहायला मिळालं आहे.  प्रेक्षकांच्या मते, शाहिदने 'हुसैन उस्तारा' या गँगस्टरच्या भूमिकेत स्वतःला पूर्णपणे झोकून दिले आहे. 'ओ रोमिओ'च्या प्रमोशनसाठी शाहिद सध्या विविध ठिकाणी मुलाखती देताना दिसतोय.  नुकतंच 'मुंटा'ला मुलाखतीत शाहिद कपूरनं मराठी सिनेसृष्टीबद्दल मोठे वक्तव्य केले आहे.  इतकेच नव्हे तर, भविष्यात मराठीत काम करण्याची संधी मिळाली तर आपली भूमिका काय असेल, याचा खुलासाही त्याने केला आहे.

शाहिदला जेव्हा 'तू मराठी चित्रपट पाहतोस का?' आणि 'तुला मराठीत काम करायला आवडेल का?' असा प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा तो म्हणाला, "हो, मला काही मराठी चित्रपट नक्कीच माहित आहेत. मराठी सिनेमांचे आशय-विषय सुंदर असतात".

शाहिदची अट
मराठी चित्रपटात काम करण्याच्या इच्छेबाबत बोलताना शाहिदने आपली एक शिस्तबद्ध बाजू मांडली. तो म्हणाला, "कोणत्याही भाषेत काम करण्याआधी त्या भाषेवर प्रभुत्व मिळवणं माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. भविष्यात मला मराठीत काम करण्याची संधी मिळाली, तर मी सर्वात आधी मराठी भाषा नीट आत्मसात करेन आणि त्यानंतरच अभिनय करेन". भाषेची जाण असल्याशिवाय भूमिकेला न्याय देता येत नाही, असा विश्वास त्याने व्यक्त केला.

 

Web Title : शाहिद कपूर मराठी फिल्मों में काम करने को तैयार, पर एक शर्त के साथ।

Web Summary : शाहिद कपूर, 'ओ रोमियो' का प्रचार करते हुए, मराठी सिनेमा में रुचि व्यक्त की। उन्होंने कहा कि वह अभिनय करने से पहले सबसे पहले भाषा में महारत हासिल करेंगे, भूमिकाओं को प्रभावी ढंग से चित्रित करने के लिए भाषाई समझ के महत्व पर जोर दिया।

Web Title : Shahid Kapoor open to Marathi films, but with a condition.

Web Summary : Shahid Kapoor, promoting 'O Romeo', expressed interest in Marathi cinema. He stated he'd first master the language before acting, emphasizing the importance of linguistic understanding for portraying roles effectively.