थायलंडच्या या सुंदरीने जिंकली ७२ वी मिस वर्ल्ड स्पर्धा; नंदिनी गुप्ता टॉप 8 मधून बाहेर पडली
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2025 00:46 IST2025-06-01T00:45:55+5:302025-06-01T00:46:42+5:30
मिस वर्ल्ड २०२५ च्या स्पर्धेत थायलंडच्या ओपल सुचाता चुआंगसरी हिनं बाजी मारली.

थायलंडच्या या सुंदरीने जिंकली ७२ वी मिस वर्ल्ड स्पर्धा; नंदिनी गुप्ता टॉप 8 मधून बाहेर पडली
'मिस वर्ल्ड २०२५ या स्पर्धेत थायलंडच्या ओपल सुचाता चुआंगसरी हिनं मिस वर्ल्ड २०२५'चा मुकुट जिंकला. जगभरातील स्पर्धकांनी यात भाग घेतला होता. भारताची नंदिनी गुप्ता टॉप ८ मधून बाहेर पडली.
सुचाता चुआंगसरी हिचा जन्म २० सप्टेंबर २००३ रोजी थायलंडमध्ये झाला. ती थाई मॉडेल आणि सौंदर्य स्पर्धेची विजेती देखील आहे. मिस वर्ल्ड बनणारी ती पहिली थाई महिला आहे, तिने तिच्या देशासाठी हा मुकुट जिंकला. यापूर्वी ती 'मिस युनिव्हर्स थायलंड २०२४' देखील राहिली आहे.
७२ व्या मिस वर्ल्ड स्पर्धेचा ग्रँड फिनाले शनिवारी हैदराबादमध्ये पार पडले. भारताची नंदिनी गुप्ता हिने जिंकण्यासाठी प्रयत्न केले. पण तिचे हे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही.
'मिस वर्ल्ड २०२५' चा मुकुट परिधान केलेली सुचाता चुआंगसरी स्टेजवर भावुक होताना दिसली. सुचाता सर्वांचे आभार मानताना हात जोडत होती. डोळ्यात अश्रू आणून ती हा क्षण अनुभवताना दिसली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.