Nusrat Jahan ने दोन खास लोकांसोबत साजरी केली दिवाळी, पहिल्यांदाच दाखवली मुलाची झलक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2021 12:23 IST2021-11-05T12:00:55+5:302021-11-05T12:23:25+5:30
गेल्या काही महिन्यांपासून ती अभिनेता यशदास गुप्ता (Yashdas Gupta) ला डेट करत आहे. नुसरत जहां (Nusrat Jahan) काही फोटो दिवाळीनिमित्त व्हायरल झाले आहेत.

Nusrat Jahan ने दोन खास लोकांसोबत साजरी केली दिवाळी, पहिल्यांदाच दाखवली मुलाची झलक
बंगाली सिनेमांची लोकप्रिय अभिनेत्री आणि TMC खासदार नुसरत जहां (Nusrat Jahan) गेल्या काही महिन्यांपासून तिच्या खाजगी आयुष्यामुळे चांगलीच चर्चेत आहे. पतीपासून वेगळी झाल्यानंतर तिने एका मुलाला जन्म दिलाय. ज्याचं नाव तिने इशान ठेवलं. गेल्या काही महिन्यांपासून ती अभिनेता यशदास गुप्ता (Yashdas Gupta) ला डेट करत आहे. अभिनेत्री काही फोटो दिवाळीनिमित्त व्हायरल झाले आहेत.
नुसरत जहां (Nusrat Jahan) ने यावर्षी जल्लोषात दिवाळी साजरी केली. या सेलिब्रेशनमध्ये तिच्यासोबत दोन खास लोक होते. त्यांचे फोटो तिने इन्स्टाग्राम हॅंडलवर शेअर केले. जे व्हायरल झाले आहेत. हे दोन लोक दुसरे कुणी नाही तर नुसरतचा मुलगा आणि तिचा बॉयफ्रेन्ड यशदास गुप्ता आहे.
नुसरत जहांने पहिल्यांदाच आपल्या मुलाचा फोटो पोस्ट केलाय. पण फॅन्स थोडे निराश झाले. कारण फोटोत नुसरतच्या मुलाचा फोटो दिसत नाहीये. तिने मुलाला जवळ घेतलं आहे, त्याचा फोटो मागून काढलाय. त्यामुळे फॅन्सना त्याचा चेहरा दिसू शकला नाही.
२६ ऑगस्टला नुसरता जहांने बाळाला जन्म दिला. त्यानंतर नुसरत आता कामावर परत आली आहे. इतकंच काय तर ती आता लोकांमध्येही जाते. काही दिवसांपूर्वी नुसरतच्या मुलाच्या नावाची खूप चर्चा झाली होती. मुलाच्या बर्थ रजिस्ट्रेशनचे डीटेल्स कोलकाता म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या पोर्टलवर समोर आले होते. अशाप्रकारे मुलाच्या वडिलाचं नाव लोकांसमोर आलं होतं. समोर आलेल्या माहितीनुसार मुलाचं नाव ईशान जे दासगुप्ता लिहिलं आहे. तर वडिलांचं नाव देबाशीश दासगुप्ता लिहिलं आहे. अभिनेता यश दासगुप्ताचं अधिकृत नाव देबाशीस दासगुप्ता आहे.