हळद लागली! ऐन दिवाळीत नोरा फतेहीची लगीनघाई? कोरियन अभिनेत्यासोबत हळदीचे फोटो झाले व्हायरल
By कोमल खांबे | Updated: October 21, 2025 11:33 IST2025-10-21T11:33:24+5:302025-10-21T11:33:45+5:30
ऐन दिवाळीत नोराचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. हे फोटो पाहून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला असून अभिनेत्रीच्या लग्नाच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. नोराचे कोरियन अभिनेत्यासोबतचे हळदीचे फोटो व्हायरल झाल्याने चर्चांना उधाण आलं आहे.

हळद लागली! ऐन दिवाळीत नोरा फतेहीची लगीनघाई? कोरियन अभिनेत्यासोबत हळदीचे फोटो झाले व्हायरल
बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही तिच्या अदांमुळे प्रत्येकालाच घायाळ करत असते. पण, सध्या नोरा एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. ऐन दिवाळीत नोराचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. हे फोटो पाहून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला असून अभिनेत्रीच्या लग्नाच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. नोराचे कोरियन अभिनेत्यासोबतचे हळदीचे फोटो व्हायरल झाल्याने चर्चांना उधाण आलं आहे.
नोराने तिच्या इन्स्टाग्रामवरुन काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये ती कोरियन अभिनेता मिन होसोबत पोझ देताना दिसत आहे. दोघांनीही पिवळ्या रंगाची कपडे परिधान केल्याचं दिसत आहे. तर काही फोटोंमध्ये दोघांच्याही अंगाला हळद लागल्याचं दिसत आहे. "नोरा-मिन हो हळद कार्यक्रम..." असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे. या फोटोंवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत.
नोरा खरंच लग्न करतेय की कोणत्या शूटिंगचा हा भाग आहे? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. "तुझं लग्न होतंय का?", "हे शूटिंग आहे की रियल?", "हे कधी झालं?", "हे फोटो Ai चे आहेत का?", "या दोघांचं लग्न...आयकॉनिक जोडी", अशा अनेक कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.