'खट्याळ सासू नाठाळ सून' सिनेमात निवेदिता सराफ यांना होती पहिली पसंती, पण नंतर वर्षा उसगांवकर यांची लागली वर्णी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 20:13 IST2025-10-15T20:12:36+5:302025-10-15T20:13:41+5:30
Nivedita Saraf And Varsha Usgaonkar: १९८७ साली 'खट्याळ सासू नाठाळ सून' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांची खूप चांगली पसंती मिळाली होती. तुम्हाला माहित आहे का, की या सिनेमात वर्षा उसगांवकर यांच्या भूमिकेसाठी निवेदिता सराफ यांना पहिली पसंती होती. मात्र नंतर यात वर्षा यांची वर्णी लागली.

'खट्याळ सासू नाठाळ सून' सिनेमात निवेदिता सराफ यांना होती पहिली पसंती, पण नंतर वर्षा उसगांवकर यांची लागली वर्णी
१९८७ साली 'खट्याळ सासू नाठाळ सून' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांची खूप चांगली पसंती मिळाली होती. या चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे, नितीश भारद्वाज, वर्षा उसगांवकर, प्रेमा किरण आणि दया डोंगरे हे कलाकार मुख्य भूमिकेत होते. तुम्हाला माहित आहे का, की या सिनेमात वर्षा उसगांवकर यांच्या भूमिकेसाठी निवेदिता सराफ यांना पहिली पसंती होती. मात्र नंतर यात वर्षा यांची वर्णी लागली. याबद्दल खुद्द निवेदिता सराफ यांनी लोकमत फिल्मीच्या नो फिल्टर शोमध्ये खुलासा केला.
निवेदिता सराफ म्हणाल्या की, '''खट्याळ सासू नाठाळ सून'बद्दल माझ्याशी तेव्हा बोलायला आले होते. कारण 'धुमधडाका' माझा आधीच झाला होता आणि मी मला वाटतं नाटकाच्या तिथे अण्णासाहेब देवळगावकर वगैरे ते मला भेटायला आले होते. पण नंतर ती भूमिका वर्षाने केली. पण ठीक आहे. म्हणजे कदाचित मला लहानपणापासूनच फिलोसॉफिकली तसं वाढवलं गेलं असेल की जे तुमच्या नशीबात आहे ते तुमच्याकडे येणारच. मला वाटते की आपली प्रत्येकाची सिनेइंडस्ट्री आपली जागा आहे.''
''अरे ही भूमिका मिळाली असती तर किती मजा आली असती असं वाटतं बघून अरे मला मिळाला पाहिजे होता हा रोल पण म्हणून अरे हे कसंही करून माझ्याकडेच मी कसं वळवून घेईन आणि मग तिचं मी कसं कौतुक करणार नाही. तिला मी काही बोलणार नाही. अशा प्रकारचं वागणं नव्हतं,'' असं निवेदिता सराफ यावेळी म्हणाल्या.
वर्कफ्रंट
निवेदिता सराफ या मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. निवेदिता यांना आपण विविध सिनेमा, मालिका, नाटकांमधून अभिनय करताना पाहिलंय. निवेदिता सराफ नुकतंच आई आणि बाबा रिटायर होत आहेत या मालिकेत पाहायला मिळाल्या. तसेच शेवटच्या त्या बिन लग्नाची गोष्ट सिनेमात दिसल्या होत्या. यात त्यांच्यासोबत गिरीश ओक, प्रिया बापट आणि उमेश कामत मुख्य भूमिकेत होते.