गायिका नेहा कक्करचे बॉयफ्रेन्डसोबतचे फोटो व्हायरल?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2018 15:52 IST2018-04-12T15:51:04+5:302018-04-12T15:52:21+5:30
नेहा कक्कर आणि अभिनेता हिमांश कोहली यांच्यात काहीतरी सुरु असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून चांगलीच रंगली आहे.

गायिका नेहा कक्करचे बॉयफ्रेन्डसोबतचे फोटो व्हायरल?
लागोपाठ सुपरहिट गाणी देणारी गायिका नेहा कक्कर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी ती तिच्या गाण्यामुळे नाहीतर बॉयपफ्रेन्डमुळे चर्चेत आली आहे. नेहा कक्कर आणि अभिनेता हिमांश कोहली यांच्यात काहीतरी सुरु असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून चांगलीच रंगली आहे. आता तर नेहाने दोघांचे काही खास फोटोज इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.
झालं असं की, नेहा नुकतीच एक इव्हेंटसाठी देहरादूनला गेली होती. पण पाऊस आल्याने तो इव्हेंट कॅन्सल झाला. त्यानंतर नेहाने इथे एन्जॉय करण्याची संधी अजिबात घातवली नाही. नेहाने आणि हिमांश कोहलीने इथे चांगचीच मजा केली. हेच दोघांचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. हिमांश कोहली हा यारींया सिनेमात मुख्य भूमिकेत दिसला होता.
आता दोघांनी जरी आपल्या नात्याला अधिकृतपणे नाव दिलेले नसले तरी दोघांच्या या फोटोंवरुन अनेकांना सगळं समजून आलं आहे. त्यामुळे आपल्या आवडत्या गायिकेचे हे खास फोटो तिचे चाहते शेअर करत आहेत. या दोघांनी एक गाणं एकत्र केलं असून हे गाणं लवकरच रिलीज होणार आहे.