Hardik Pandya च्या पत्नीने Natasa Stankovic ने शेअर केला फोटो; एक्स बॉयफ्रेंड Aly Goni ने दिली रिअॅक्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2021 15:30 IST2021-10-20T15:30:00+5:302021-10-20T15:30:00+5:30
Aly Goni: अली आणि नताशाचा ब्रेकअप झाल्यानंतरही ते एकमेकांचे चांगले मित्र आहेत. इतकंच नाही तर सध्या नताशाच्या एका फोटोवर अलीने दिलेली रिअॅक्शन सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

Hardik Pandya च्या पत्नीने Natasa Stankovic ने शेअर केला फोटो; एक्स बॉयफ्रेंड Aly Goni ने दिली रिअॅक्शन
झगमगत्या कलाविश्वात असे अनेक सेलिब्रिटी आहेत ज्यांनी बरीच वर्ष एकत्र घालवल्यानंतर एकमेकांची साथ सोडली. यात अशा अनेक जोड्या आहेत ज्या विभक्त झाल्यानंतर पुन्हा एकमेकांच्या समोर येणंदेखील पसंत करत नाहीत. अनेकदा हे सिलेब्रिटी एकमेकांसमोर आल्यानंतर वाट बदलतात. परंतु, या सगळ्यामध्ये अभिनेता अली गोनी (Aly Goni) आणि नताशा स्टेनकोविक (Natasa Stankovic) हे दोघं मात्र अपवाद आहेत. अली आणि नताशाचा ब्रेकअप झाल्यानंतरही ते एकमेकांचे चांगले मित्र आहेत. इतकंच नाही तर सध्या नताशाच्या एका फोटोवर अलीने दिलेली रिअॅक्शन सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.
अलीसोबत ब्रेकअप झाल्यानंतर नताशाने क्रिकेटर हार्दिक पांडयासोबत (Hardik Pandya) लग्नगाठ बांधली. या दोघांना एक लहान मुलगादेखील आहे. विशेष म्हणजे नताशा अनेकदा आपल्या चिमुकल्या लेकासोबत सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत असते. या पोस्टवर असंख्य सेलिब्रिटी कमेंट्स करतात. यात अलीचाही समावेश आहे. नताशाच्या प्रत्येक पोस्टवर अली कमेंट करत असतो. मात्र, यावेळी त्याने दिलेली कमेंट अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे.
नताशाने तिच्या लेकासोबत अगस्त्यसोबत काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ही माय-लेकाची जोडी प्रचंड गोड दिसत असून त्यावर अली गोनीनेही कमेंट केली आहे. अलीने या पोस्टवर स्मायली फेसची लव्ह इमोजीची कमेंट केली आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर विविध चर्चा रंगू लागल्या आहेत.
दरम्यान, अली आणि नताशाचा ब्रेकअप झाल्यानंतरही त्यांच्यातील मैत्री कायम आहे. अली अनेकदा नताशाच्या पोस्टवर कमेंट करत असतो. त्याचप्रमाणे नताशादेखील अलीच्या पोस्टवर कमेंट करत असते. सध्या अली जॅस्मीन भसीनला डेट करत आहे. परंतु, अजूनही चाहत्यांमध्ये नताशा- अलीची चर्चा रंगते.