पेशवाई थाट अन्...; 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्याने शेअर केला लग्नाचा Unseen Video

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 13:05 IST2025-06-06T12:59:03+5:302025-06-06T13:05:23+5:30

'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्याचं डेस्टिनेशन वेडिंग! पाहा व्हिडीओ

marthi television actor aai kuthe kay karte fame niranjan kulkarni shared her wedding unseen video  | पेशवाई थाट अन्...; 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्याने शेअर केला लग्नाचा Unseen Video

पेशवाई थाट अन्...; 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्याने शेअर केला लग्नाचा Unseen Video

Niranjan Kulkarni: छोट्या पडद्यावरील 'आई कुठे काय करते' या मालिकेने जवळपास पाच वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. या मालिकेतील प्रत्येक कलाकार हा घराघरात लोकप्रिय झाला. दरम्यान, आई कुठे काय करते मालिकेत अरुंधतीच्या मोठ्या मुलाची भूमिका साकारणारा अभिनेता निरंजन कुलकर्णी चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच निरंजनने डेस्टिनेशन वेडिंग त्याचं लग्न झाल्याचे जाहीर केलं. न्यूट्रिशनिस्ट मनीषा गुरमसोबत त्याने लग्नगाठ बांधून आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवत केली. त्यात आता अभिनेत्याने त्याच्या शाही विवाहसोहळ्याचा अनसीन खास व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या व्हिडीओने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलंय.


नुकताच निरंजन कुलकर्णीने त्याच्या लग्नातील काही खास क्षण चाहत्यांसोबत शेअर केले आहे. आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर निरंजनने त्याच्या डेस्टिनेशन वेडिंगचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. गोव्यातील मोरजीम बीचवर हा लग्नाचा सोहळा पार पडला. निळाशार समुद्र किनारा आणि पेशवाई थाट असं अशा डेस्टिनेशन वेडिंग मोठ्या थाटामाटात पार पडलं. या लग्नाला आई कुठे काय करते मालिकेच्या कलाकारांनीही हजेरी लावली होती. शुभमंगल सावधान !! असं कॅप्शन देत अभिनेत्याने त्याचा लग्नाचा सुंदर व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर केला आहे. या कॅप्शनखाली अभिनेत्याने #निरंजन कुलकर्णी, #विवाहसोहळा, #डेस्टिनेशन वेडिंग असे हॅशटॅग वापरले आहेत. 

दरम्यान, निरंजन कुलकर्णीने शेअर केलेल्या या व्हिडीओला अनेक कलाकारांनी व चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे. अभिनेत्री गौरी कुलकर्णी, ऋतुराज फडके तसेच मुग्धा गोडबोले या कलाकारांनी या जोडप्याला भरभरुन शुभेच्छा दिल्या आहेत. 

Web Title: marthi television actor aai kuthe kay karte fame niranjan kulkarni shared her wedding unseen video