'देवमाणूस 2' मध्ये नव्या अभिनेत्रीची एन्ट्री; 'लागिर झालं जी'मध्ये साकारलीये महत्त्वपूर्ण भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2021 01:47 PM2021-12-31T13:47:01+5:302021-12-31T13:47:45+5:30

devmanus 2: 'देवमाणूस 2' या मालिकेत जुन्या कलाकारांसोबतच काही नवीन चेहरेदेखील पाहायला मिळत आहेत. त्यातच आता या मालिकेत 'लागिर झालं जी' या मालिकेतील एका अभिनेत्रीची एन्ट्री होणार आहे.

marathi tv serial lagir zal ji fame actress shivani entry in devmanus 2 | 'देवमाणूस 2' मध्ये नव्या अभिनेत्रीची एन्ट्री; 'लागिर झालं जी'मध्ये साकारलीये महत्त्वपूर्ण भूमिका

'देवमाणूस 2' मध्ये नव्या अभिनेत्रीची एन्ट्री; 'लागिर झालं जी'मध्ये साकारलीये महत्त्वपूर्ण भूमिका

googlenewsNext

छोट्या पडद्यावर तुफान गाजलेली मालिका म्हणजे 'देवमाणूस'.  या मालिकेतील कलाकार आणि उत्तम कथानक यांच्यामुळे ही मालिका अल्पावधीत तुफान लोकप्रिय झाली. इतकंच नाही तर या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतल्यानंतर अनेकांनी हळहळ व्यक्त केली होती. त्यामुळेच प्रेक्षकांचा मिळत असलेला उदंड प्रतिसाद पाहून 'देवमाणूस 2' हा नवा भागही प्रेक्षकांच्या भेटीला आला. विशेष म्हणजे पहिल्या भागाप्रमाणेच हा भागही रंजक आहे. त्यामुळे हा भागदेखील पहिल्या दिवसापासून लोकप्रिय झाला. यामध्येच आता या मालिकेत एका नव्या अभिनेत्रीची एन्ट्री होणार आहे. 

'देवमाणूस 2' या मालिकेत जुन्या कलाकारांसोबतच काही नवीन चेहरेदेखील पाहायला मिळत आहेत. त्यातच आता या मालिकेत 'लागिर झालं जी' या मालिकेतील एका अभिनेत्रीची एन्ट्री होणार आहे. विशेष म्हणजे या मालिकेत ही अभिनेत्री महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे. 

'देवमाणूस 2' या मालिकेत अभिनेत्री शिवानी घाटगे हिची एन्ट्री होणार आहे. शिवानीने यापूर्वी लागिर झालं जी या मालिकेत शितलीच्या सूमन काकीची भूमिका साकारली होती. आता 'देवमाणूस 2' या मालिकेत ती महत्त्वाची भूमिका साकारणार आहे.

दरम्यान, 'देवमाणूस' च्या पहिल्या भागाच्या प्रोमोमध्येदेखील शिवानीची झलक दाखवण्यात आली होती. मात्र, आता देवमाणूस २ मध्ये तिचे काही महत्त्वाचे सीन शूट करण्यात येणार आहेत. त्यामुळे या मालिकेत शिवानी आता नेमकी कोणती भूमिका साकारणार याकडे सगळ्याचं लक्ष वेधलं आहे.
 

Web Title: marathi tv serial lagir zal ji fame actress shivani entry in devmanus 2

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.