अवतीभवती रुप विठ्ठलाचे...! आषाढी एकादशीनिमित्त जुई गडकरीने शेअर केला सुंदर व्हिडीओ, होतंय कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2025 12:40 IST2025-07-06T12:32:45+5:302025-07-06T12:40:39+5:30
पंढरपूरची 'वारी' हा समता, बंधुता, एकतेचा संदेश देणारा सामाजिक आणि सांस्कृतिक उत्सव आहे.

अवतीभवती रुप विठ्ठलाचे...! आषाढी एकादशीनिमित्त जुई गडकरीने शेअर केला सुंदर व्हिडीओ, होतंय कौतुक
Jui Gadkari: पंढरपूरची 'वारी' हा समता, बंधुता, एकतेचा संदेश देणारा सामाजिक आणि सांस्कृतिक उत्सव आहे. आज रविवारी पंढरपूरमध्ये आषाढी सोहळा मोठ्या भक्तीमय वातावरणात साजरा होत आहे. पांडुरंगाच्या दर्शनाची आस डोळ्यांत घेऊन वारकरी पंढरपुरात दाखल झाले आहेत. लाखो भाविकांनी पंढरी नगरी दुमदुमली आहे. आषाढी एकादशीच्या महोत्सवात संपूर्ण महाराष्ट्र भक्तिरंगात न्हाऊन निघतो. यंदाच्या या वारीमध्ये अनेक मराठी कलाकार देखील सामील झाले होते. विठुरायाच्या भक्तीत तल्लीन झााल्याचे पाहायला मिळाले. अशातच आषाढी एकादशीच्या निमित्ताने ठरलं तर मग फेम अभिनेत्री जुई गडकरीने (Jui Gadkari) शेअर केलेल्या व्हिडीओची चर्चा आहे.
जुई गडकरीने नुकताच सोशल मीडियावर सुंदर व्हिडीओ शेअर केला आहे. हातात विठ्ठलाची मूर्ती घेऊन तिने हा खास व्हिडीओ बनवला आहे. सुंदर साडी तसेच केसात फुल माळून जुईने पारंपरिक लूकमध्ये दिसते आहे. अभिनेत्रीचा हा व्हिडीओ चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. तिचा हा व्हिडीओ पाहून चाहतेही विठूरायाच्या स्मरणात व्यग्र झाले आहेत. दरम्यान, अभिनेत्रीने या व्हिडीओला माझा भाव तुझे चरणी, तुझे रूप माझे नयनीं... असं कॅप्शन देत ती विठुरायाच्या भक्तीत तल्लीन झाल्याचं पाहायला मिळतंय. शिवाय जुईचे चाहते या व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.
वर्कफ्रंट
जुई गडकरी हा मराठी टेलिव्हिजनचा लोकप्रिय चेहरा आहे. 'पुढचं पाऊल' मालिकेतून सोशिक सून बनून घराघरात पोहोचलेली जुई सध्या 'ठरलं तर मग' मालिकेत स्मार्ट, हुशार आणि प्रेमळ सूनेची भूमिका साकारत आहे. जुईने 'माझिया प्रियाला प्रीत कळेना', 'पुढचं पाऊल', 'सरस्वती' यांसारख्या गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे.