'आपल्यात नवरा-बायकोचं नातं नाही'; रायाने कृष्णाला केलं स्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2021 16:31 IST2021-10-28T16:28:34+5:302021-10-28T16:31:01+5:30

Mann zaal bajind: या दोघांचं लग्न कोणत्या परिस्थितीमध्ये पार पडलंय हे साऱ्यांनाच ठावूक आहे. त्यामुळे घरात एकीकडे आनंदाचं वातावरण असलं तरीदेखील राया आणि कृष्णा दोघंही खिन्न आहेत.  

marathi serial mann zaal bajind raya clear to krishna | 'आपल्यात नवरा-बायकोचं नातं नाही'; रायाने कृष्णाला केलं स्पष्ट

'आपल्यात नवरा-बायकोचं नातं नाही'; रायाने कृष्णाला केलं स्पष्ट

छोट्या पडद्यावरील अल्पावधीत लोकप्रिय ठरलेली मालिका म्हणजे 'मन झालं बाजिंद' (Mann zaal Bajind). या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांना आपलंसं करुन घेतलं आहे. त्यामुळे या मालिकेतील प्रत्येक घटनाक्रमाबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. अलिकडेच राया आणि कृष्णाचा लग्नसोहळा पार पडला. या दोघांचं लग्न कोणत्या परिस्थितीमध्ये पार पडलंय हे साऱ्यांनाच ठावूक आहे. त्यामुळे घरात एकीकडे आनंदाचं वातावरण असलं तरीदेखील राया आणि कृष्णा दोघंही खिन्न आहेत.  यामध्येच 'आपल्यामध्ये नवरा-बायकोचं नात कधीच निर्माण होऊ शकत नाही', असं रायाने कृष्णाला थेटपणे सांगितलं आहे.

अलिकडेच झी मराठीने या मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये राया आणि कृष्णा यांच्यातील संवाद दाखविला आहे. यात आपलं नातं नवरा-बायकोचं नाही हे रायाने सांगितलं आहे. परंतु, रायाच्या या वाक्यामुळे कृष्णा चांगलीच कोलमडून गेली आहे.

कृष्णा परतणार घरी; थांबवू शकेल का राया -अंतराचं लग्न?

"आपलं लग्न कोणत्या परिस्थिती झालंय हे तुलाही माहित आहे. त्यामुळे या खोलीबाहेर जरी आपण एकमेकांचे नवरा-बायको असलो तरीदेखील या खोलीत आपलं नवरा-बायकोचं नातं नसेल", असं राया कृष्णाला सांगतो. 

दरम्यान, आधीच ज्या परिस्थीती कृष्णाचं लग्न लावण्यात आलं त्यामुळे ती खचून गेली आहे. त्यातच रायाचे हे शब्द ऐकल्यामुळे ती एकदम कोलमडून गेली आहे. त्यामुळे या दोघांमधील नातं आता कोणत्या वळणावर जाईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या मालिकेने अभिनेत्री श्वेता खरातने (shweta kharat) कृष्णा ही भूमिका साकारली आहे. तर वैभव चव्हाण(vibhav chavan) रायाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. 
 

Web Title: marathi serial mann zaal bajind raya clear to krishna