प्रथमेश कदमसोबत मराठी बोलत होती श्रद्धा कपूर, रीलस्टारच्या निधनानंतर व्हिडीओ होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2026 18:16 IST2026-01-27T18:16:24+5:302026-01-27T18:16:54+5:30

मराठी कंटेट क्रिएटर आणि सोशल मीडिया स्टार प्रथमेश कदमचं २६ जानेवारीला निधन झालं. प्रथमेशच्या अचानक झालेल्या निधनाने त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. त्याच्या निधनानंतर प्रथमेशचे काही जुने व्हिडीओ व्हायरल होत आहेत. रीलस्टारचा बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरसोबतचा एक व्हिडीओही व्हायरल होत आहे. 

marathi content creator prathmesh kadam video with shraddha kapoor viral after his death | प्रथमेश कदमसोबत मराठी बोलत होती श्रद्धा कपूर, रीलस्टारच्या निधनानंतर व्हिडीओ होतोय व्हायरल

प्रथमेश कदमसोबत मराठी बोलत होती श्रद्धा कपूर, रीलस्टारच्या निधनानंतर व्हिडीओ होतोय व्हायरल

मराठी कंटेट क्रिएटर आणि सोशल मीडिया स्टार प्रथमेश कदमचं २६ जानेवारीला निधन झालं. प्रथमेशच्या अचानक झालेल्या निधनाने त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. तर सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. काही सोशल मीडिया स्टार्सने प्रथमेशच्या निधनाची बातमी पोस्टद्वारे चाहत्यांना दिली. प्रथमेशच्या निधनाचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. मात्र त्याच्या निधनानंतर प्रथमेशचे काही जुने व्हिडीओ व्हायरल होत आहेत. रीलस्टारचा बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरसोबतचा एक व्हिडीओही व्हायरल होत आहे. 

२०२४ मध्ये एका इव्हेंटमध्ये प्रथमेश श्रद्धा कपूरला भेटला होता. या इव्हेंटमध्ये श्रद्धासोबत संवाद साधण्याची त्याला संधी मिळाली होती. त्यावेळी श्रद्धा प्रथमेशसोबत मराठीत बोलली होती. याचा व्हिडीओ प्रथमेशने त्याच्या अकाऊंटवरुन शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये प्रथमेश सुरुवातीला इंग्रजीत श्रद्धाला "मी महाराष्ट्रीयन आहे" असं म्हणाला होता. त्यानंतर श्रद्धा "मीदेखील महाराष्ट्रीयन आहे" असं म्हणाली. प्रथमेशने श्रद्धाला मराठीत दोन वाक्य बोलण्याची विनंती केली होती. तेव्हा 
श्रद्धा म्हणाली, "काय सांगू मी आता...इथे आले मी...आपण बोलतोय एकमेकांसोबत...मला खूप मज्जा येतेय. अजून काय बोलू मी". त्यानंतर प्रथमेश श्रद्धाला म्हणतो, "आम्हाल पुरणाची पोळी आणि उकडीचे मोदक खायला द्या. मग श्रद्धा त्याला म्हणते अरे बापरे आता मला भूक लागली".


प्रथमेशची अचानक झालेली एक्झिट चाहत्यांसाठी चटका लावणारी आहे. त्याच्या निधनाने आई आणि बहिणीवर दु: खाचा डोंगर कोसळला आहे. कोरोनामध्ये प्रथमेशच्या वडिलांचं निधन झालं होतं. त्यानंतर संपूर्ण घराची जबाबदारी त्याने सांभाळली होती. गेल्या महिनाभरापासून तो हॉस्टिपलमध्ये अॅडमिट होता. त्याच्या निधनाचं नेमकं कारण अद्याप कळू शकलेलं नाही. पण, प्रथमेशची मैत्रीण आणि रीलस्टार असलेल्या सई उत्तेकर हिने त्याच्या पोटात इन्फेक्शन झाल्यामुळे त्याचं निधन झाल्याची माहिती दिली आहे. प्रथमेश हा रीलस्टार असण्यासोबतच एक डान्सर आणि कोरिओग्राफरही होता. आईसोबत तो व्हिडीओ बनवायचा. त्याची आईदेखील लोकप्रिय रीलस्टार आहे. अनेक अल्बम साँगमध्ये त्या दोघांनीही काम केलं आहे. 

Web Title : प्रथमेश कदम के निधन के बाद श्रद्धा कपूर का मराठी वीडियो वायरल

Web Summary : मराठी कंटेंट क्रिएटर प्रथमेश कदम का 26 जनवरी को निधन हो गया। 2024 में एक कार्यक्रम में श्रद्धा कपूर के साथ मराठी में बात करते हुए उनका एक वीडियो वायरल हो गया है। कदम की अचानक मौत से प्रशंसक सदमे में हैं। पेट में संक्रमण के कारण उन्हें एक महीने से अस्पताल में भर्ती कराया गया था।

Web Title : Shraddha Kapoor's Marathi Conversation with Prathamesh Kadam Goes Viral Post Demise

Web Summary : Marathi content creator Prathamesh Kadam passed away on January 26th. A video of Shraddha Kapoor speaking Marathi with him at an event in 2024 has gone viral. Kadam's sudden death shocked fans. He was admitted to the hospital for a month due to a stomach infection.