"माकड दिसतेयेस माकड...", क्रांती रेडकरला दिग्दर्शक असं का म्हणाला? जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 12:48 IST2025-09-19T12:47:59+5:302025-09-19T12:48:40+5:30
Kranti Redkar : क्रांती रेडकरने मराठी चित्रपटसृष्टीत वेगवेगळ्या भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. क्रांतीने जत्रा, ऑन ड्युटी २४ तास, माझा नवरा तुझी बायको, नो एन्ट्री पुढे धोका आहे यांसारख्या लोकप्रिय चित्रपटात काम केले आहे.

"माकड दिसतेयेस माकड...", क्रांती रेडकरला दिग्दर्शक असं का म्हणाला? जाणून घ्या
क्रांती रेडकर (Kranti Redkar) मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने मराठी चित्रपटसृष्टीत वेगवेगळ्या भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. क्रांतीने जत्रा, ऑन ड्युटी २४ तास, माझा नवरा तुझी बायको, नो एन्ट्री पुढे धोका आहे यांसारख्या लोकप्रिय चित्रपटात काम केले आहे. क्रांतीला जत्रा सिनेमा (Jatra Movie) आणि त्यातील कोंबडी पळाली या गाण्यातून चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. दरम्यान आता लोकमत फिल्मीमध्ये जत्रा सिनेमाच्या टीमचं रियुनियन पार पडलं. यावेळी या सिनेमातल्या कलाकारांनी अनेक आठवणींना उजाळा दिला. त्यावेळी क्रांती रेडकरनं तिला दिग्दर्शक ''माकड दिसतेयेस माकड...'' असं म्हणाल्याचंही सांगितलं.
क्रांती रेडकरने लोकमत फिल्मीमध्ये जत्राच्या रियुनियनमध्ये केदार शिंदेंबद्दल बोलताना सांगितलं की, हाच तो व्यक्ती आहे ज्याच्यामुळे मी मेकअप शिकले. ह्याची सांगायची पद्धत अशी नाही ना कधीच की क्रांती जरा मेकअप शिक तुझा चांगला होत नाही. हे काय माकडासारखा चेहरा करुन बसलीस. माकड दिसतेयस माकड. म्हणजे अपनेको ऐसा लगता है की मर जाऊ में, में मर जाऊ. आणि आपल्या मनात आपण हिरोइन दिसत असतो ना आणि समोरचा म्हणतोय माकड दिसतेयस माकड असं म्हटल्यावर म्हटलं नाही आता मला शिकलं पाहिजे.
'जत्रा' सिनेमाबद्दल
'जत्रा' हा मराठीतील एव्हरग्रीन चित्रपटांपैकी एक आहे. २००५ साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट आजही प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करतो. केदार शिंदेंच्या या चित्रपटातील डायलॉग आजही प्रेक्षकांना जसेच्या तसे पाठ आहेत. 'जत्रा'मध्ये अनेक नवखे कलाकार दिसले होते. क्रांती रेडकर व्यतिरिक्त या सिनेमात प्रिया बेर्डे, भरत जाधव, क्रांती रेडकर आणि सिद्धार्थ जाधव हे कलाकार प्रमुख भूमिकेत होते.