"मी बीडचा आहे त्यामुळे..."; लेखक अरविंद जगताप यांचं सूचक विधान, मांडल्या मनातील भावना

By देवेंद्र जाधव | Updated: March 13, 2025 11:46 IST2025-03-13T11:44:51+5:302025-03-13T11:46:56+5:30

संवेदनशील लेखक अरविंद जगताप यांनी बीड शहराला उद्देशून केलेलं विधान चर्चेत आहे (arvind jagtap)

writer arvind jagtap talk about beed politics news dhananjay munde pankaja munde | "मी बीडचा आहे त्यामुळे..."; लेखक अरविंद जगताप यांचं सूचक विधान, मांडल्या मनातील भावना

"मी बीडचा आहे त्यामुळे..."; लेखक अरविंद जगताप यांचं सूचक विधान, मांडल्या मनातील भावना

'गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा', 'गोष्ट छोटी डोंगराएवढी', 'आणी बाणी' अशा संवेदनशील सिनेमांच्या लेखनाची जबाबदारी सांभाळणारे लेखक म्हणजे अरविंद जगताप. 'चला हवा येऊ द्या'च्या (chala hava yeu dya) माध्यमातून अरविंद यांनी उत्कृष्ट पत्रलेखन करुन सर्वांच्या डोळ्यात पाणी आणलं. अभिनेता सागर कारंडे जेव्हा अरविंद यांनी लिहिलेली पत्र वाचायचा तेव्हा संपूर्ण मंच स्तब्ध होऊन जायचा. अरविंद (arvind jagtap) यांनी नुकत्याच एका मुलाखतीत केलेलं विधान चर्चेत आहे.

अरविंद जगताप यांचं सूचक विधान

आवाहन IPH या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत अरविंद जगताप यांनी खास किस्सा सांगितला की, "आमचा मित्र मकरंद अनासपुरे.. त्याने मला सांगितलंं की, मी एक सिनेमा करतोय. त्या सिनेमाला पॉलिटिकल बॅकग्राऊंड आहे. थोडा सिनेमा मराठवाड्याच्या स्टाईलचा त्याला हवा होता. तर तो सिनेमा लिहिण्यासाठी मकरंदने मला सांगितलं.  पुण्यामध्ये स्वरुप हॉटेल आहे. तिथे अक्षरशः मला कोंडून ठेवलं. पुढे मग दोन-तीन दिवसांमध्ये तो सिनेमा लिहून पूर्ण करुन त्याला दिला. त्या सिनेमाचं नाव गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा"

"गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा हा सिनेमा लिहिल्यावर तो सिनेमा इतका हिट होईल हे माहित नव्हतं. किंवा सिनेमाच्या टीमलाही याविषयी कल्पना नव्हती. पण तो सिनेमा वर्क झालं. लोक मला विचारतात की, तुम्ही एवढं राजकारण कसं काय जाणता . मी त्यांना सांगतो की- मी बीडचा आहे. आमच्याकडे कामच नाहीये. सकाळपासून पंकू ताईंनी काय केलं? धनुभाऊंनी काय केलं? क्षीरसागरांनी काय केलं? पाणी नाही, शेतीला काही कामधंदा नाही, MIDC नाही, करणार काय मग आम्ही?" अशाप्रकारे अरविंद जगताप यांनी मनातील भावना शेअर केल्या.

Web Title: writer arvind jagtap talk about beed politics news dhananjay munde pankaja munde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.