गिरिजा ओक मराठी चित्रपटांमध्ये फारशी का दिसत नाही? अभिनेत्रीने स्वत:च संगितलं कारण, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2026 14:26 IST2026-04-13T14:16:13+5:302026-04-13T14:26:11+5:30

मराठीसह हिंदी सिनेविश्वातही आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांच्या मनावर उमटवणारी नायिका म्हणजे गिरिजा ओक. सध्या गिरिजा एका मुलाखतीमुळे चर्चेत आली आहे.

why is girija oak not seen much in marathi films the actress told the reason says | गिरिजा ओक मराठी चित्रपटांमध्ये फारशी का दिसत नाही? अभिनेत्रीने स्वत:च संगितलं कारण, म्हणाली...

गिरिजा ओक मराठी चित्रपटांमध्ये फारशी का दिसत नाही? अभिनेत्रीने स्वत:च संगितलं कारण, म्हणाली...

Girija Oak: मराठीसह हिंदी सिनेविश्वातही आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांच्या मनावर उमटवणारी नायिका म्हणजे गिरिजा ओक. अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारणारी गिरिजा आता ‘नॅशनल क्रश’ देखील झाली आहे.रंगभूमीवरही वेगवेगळे नाटकाचे प्रयोग करत तिने चाहत्यांच्या मनावर आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. सध्या गिरिजा ओक एका मुलाखतीमुळे चर्चेत आली आहे.

नुकतीच गिरिजा ओकने 'अमोल परचुरेंच्या कॅचअप मराठी' ला मुलाखत दिली. 
या मुलाखतीत तिला तू मराठी चित्रपटांमध्ये मोजकं काम करतेस, असं अनेकांना वाटतं. याबद्दल विचारण्यात आलं. त्यावर उत्तर देत गिरीजा म्हणाली," मला खूप मराठी चित्रपट ऑफर झालेत आणि मी त्यांना नकार दिलाय,असं कधीच झालं नाही. प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर, मला आजवर तितकं मराठी काम ऑफर झालेलं नाही. " यानंतर गिरिजाने सांगितलं," अलिकडेच  सारंगबरोबर मी, प्रिया आणि रेणुका ताई आणि मिथिला बोलत होतो. तेव्हा देखील या मुद्द्यावर चर्चा झाली की आम्ही सगळ्या हिंदीत काम करतोय.सध्या प्रिया बापट मराठीत खूप काम करतेय. पण, मराठीत मला कोणी फार काही चित्रपट ऑफर केलेले नाहीत."

मग मुलाखतीत गिरिजाला नाटकांमध्येही तू कमी दिसतेस? असा प्रश्न विचारणात आला. तेव्हा ती म्हणाली,"दोन स्पेशलनंतर मला लागोपाठ २-३ नाटकं ही जुनी नाटकं पुनर्जीवित करुया, यासाठी विचारणा करण्यात आली. मला नवीन काहीतरी करायला खूप आवडलं असतं. म्हणजे अशा नाटकांमध्ये काम करू नये, या मताची मी नाही. पण, मला ते करायची इच्छा नव्हती. आणि एक-दोन वेळा सगळं जमून आलं पण त्याचं काही पुढे झालं नाही. शिवाय व्यावसायिक नाटक म्हटलं तर त्याला वेगळ्या प्रकारची कमिटमेन्ट द्यावी लागते. जी तेव्हा मला देता येत नव्हती. मग ठकीशी संवादबद्दल बोलणं झालं आणि मला ती संहिता खूप आवडली." 

"मला हिंदीत काम मिळतं म्हणून मी करते हा चॉईस नाहीये. आजपर्यंत असं एकदाही झालेलं नाही की, मला एका वेळेला मराठी आणि हिंदीसाठी विचारलं गेलं आणि मी मराठीला डावलून हिंदी निवडलं.कारण, मला ते जास्त मोठं वाटलं, असं कधीच झालेलं नाही.  मी बऱ्याचदा मराठीच्या प्रयोगांसाठी हिंदी प्रोजेक्ट्स सोडले आहेत. किंवा त्यांना तारखेत बदल करायला सांगितला आहे.पण, खरंच मला खूप कमी प्रोजेक्टसाठी विचारलं गेलंय." असं अभिनेत्रीने या मुलाखतीत सांगितलं.

Web Title: why is girija oak not seen much in marathi films the actress told the reason says