"फक्त सॉरी म्हणून सगळं नीट झालं तर...", असं का म्हणतोय आदिनाथ कोठारे?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2023 18:22 IST2023-09-30T18:22:05+5:302023-09-30T18:22:47+5:30
Adinath Kothare : अभिनेता आदिनाथ कोठारेने नुकतेच लोकमत फिल्मीच्या नो फिल्टर या शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी त्याने अभिनयातील करिअर, कॉलेजमधील किस्से अशा अनेक गोष्टींचा खुलासा केला.

"फक्त सॉरी म्हणून सगळं नीट झालं तर...", असं का म्हणतोय आदिनाथ कोठारे?
‘छकुला’ चित्रपटातून बालकलाकार म्हणून अभिनेता आदिनाथ कोठारे(Adinath Kothare)ने सिनेइंडस्ट्रीत पदार्पण केले. लहानपणापासूनच अभिनयाचं बाळकडू मिळालेला आदिनाथ आज मराठी सिनेइंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेता आहे. नुकतेच त्याने लोकमत फिल्मीच्या नो फिल्टर या शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी त्याने अभिनयातील करिअर, कॉलेजमधील किस्से अशा अनेक गोष्टींचा खुलासा केला.
नो फिल्टरमध्ये आदिनाथला विचारण्यात आले की, जर तुला कोणाला सॉरी म्हणायचं असेल तर कोणाला म्हणशील?, त्यावर तो म्हणाला की, माझ्या जवळच्या माणसांना त्रास देतो. पण ती चुक दुरुस्त करण्याची संधी देखील मला मिळते. परंतु मला लगेच सगळं पॉझिटिव्ह हवं असतं. पण त्याचे दुष्परिणाम असतात. मग त्यासाठी समोरच्याला थोडा वेळही द्यावा लागतो. तसेतर माझे सॉरी पेडिंग नाहीयेत. काही लोकांना दुखावलं असेल आणि सॉरीही म्हणलो असेन पण फक्त सॉरी बोलून सगळेच प्रश्न सुटत नाहीत.
आदिनाथ कोठारेच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर त्याने मराठीबरोबरच बॉलिवूडमध्येही आपली ओळख निर्माण केली आहे. '८३' या चित्रपटात तो झळकला होता. त्यानंतर 'क्रिमिनल जस्टिस', 'सिटी ऑफ ड्रीम्स' या वेब सीरिजमध्ये तो महत्त्वाच्या भूमिकेत दिसला. आता तो 'बजाओ' या वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.