Vogue Beauty Awards 2019: सारा,जान्हवीला विसरा 'या' मराठमोळ्या अभिनेत्याच्या मुलीला पाहा, दिसली इतकी ग्लॅमरस
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2019 13:40 IST2019-10-03T13:36:47+5:302019-10-03T13:40:12+5:30
Vogue Beauty Awards 2019: श्रियाने ब्लॅक शिमर स्ट्रीपलेस वनपिस परिधान केला होता. यावेळी तिच्या या स्टायलिश ड्रेसिंगमुळे ती जणू काही मस्त्यकन्येप्रमाणेच भासत होती.

Vogue Beauty Awards 2019: सारा,जान्हवीला विसरा 'या' मराठमोळ्या अभिनेत्याच्या मुलीला पाहा, दिसली इतकी ग्लॅमरस
सचिन पिळगावकर यांनी गेली अनेक दशकं आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं आहे. सचिन यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नी सुप्रिया पिळगावकर यांनीही मराठी, हिंदी सिनेमांसह मालिका तसंच रियालिटी शोमध्ये आपली जादू दाखवली आहे. आता या दोघांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांची लेक श्रिया पिळगावकरसुद्धा अभिनयात स्वतःची ओळख बनवत आहे. 'एकुलती एक या पदार्पणाच्या सिनेमातून आपल्या वडिलांसह स्क्रीन शेअर रुपेरी पडद्यावर एंट्री मारलेल्या श्रियाने आपल्या अभिनयाने रसिकांची पसंती मिळवण्यास सुरुवात केली. यानंतर ती किंग खान शाहरुखच्या फॅन या सिनेमातही झळकली. शिवाय फ्रेंच सिनेमातही तिने काम केले आहे.
श्रियाकडे एक से बढकर एक प्रोजेक्ट आहेत. सध्या काही प्रोजेक्टचे काम तिने पूर्ण केले आहे. तर काहींचे शूटिंग सुरू आहे. तुर्तास श्रिया एका एव्हेंटमध्ये ग्लॅमरस अंदाजात दिसली. तिला पाहताच सा-यांच्या नजरा तिच्याचकडे वळल्या होत्या. मीडियाचे कॅमेरे तिच्या विविध अदा कॅमे-यात कैद करण्यात बिझी होते.
या सोहळ्यात ग्लॅमरस अभिनेत्रीच्या स्टायलिश लूक, सौंदर्याने चारचाँद लावले होते. रेड कार्पेटवर ग्लॅमरस अवतारात हजेरी लावणा-या अभिनेत्रींकडेही सा-यांच्या नजरा होत्या. मात्र या सगळ्यात श्रियाने सा-यांचे लक्ष वेधून घेतल्याचे पाहायला मिळाले. श्रियाचा हा लुक पाहून नेटीझन्सही तिच्या या अदावर फिदा झाल्याचे पाहायला मिळत आहे. काही युजर्सनीतर तिची तुलना चक्क दीपिका पादुकोणशीच केली आहे. मराठीतील दीपिका पादुकोण अशा कमेंटस तिच्या या फोटोंवर येत आहेत.
रेडकार्पेटवर येताच श्रिया अभिनेता विकी कौशलसह दिसली. विकी कौशलसह मीडियाच्या कॅमे-यांना श्रिया पोज देत असल्याचे पाहायला मिळतंय. यावेळी श्रियाने ब्लॅक शिमर स्ट्रीपलेस वनपिस परिधान केला होता. यावेळी तिच्या या स्टायलिश ड्रेसिंगमुळे ती जणू काही मस्त्यकन्येप्रमाणेच भासत होती.