Ved Marathi Movie : रितेश देशमुखच्या 'वेड'चा नादखुळा!, चौथ्या आठवड्यातही कोट्यावधींची घौडदौड सुरुच
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2023 14:59 IST2023-01-24T14:59:08+5:302023-01-24T14:59:58+5:30
Ved Marathi Movie : अभिनेता रितेश देशमुखचा 'वेड' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे.

Ved Marathi Movie : रितेश देशमुखच्या 'वेड'चा नादखुळा!, चौथ्या आठवड्यातही कोट्यावधींची घौडदौड सुरुच
अभिनेता रितेश देशमुख(Riteish Deshmukh)चा 'वेड' (Ved Marathi Movie) सिनेमाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. मागील रविवारी म्हणजेच २२ जानेवारीला वेड चित्रपटाचा थिएटरमध्ये २४ वा दिवस होता. या दिवशीही रितेश-जिनिलिया(Genelia D'souza-Deshmukh)च्या या चित्रपटाने तब्बल १.७० कोटींची कमाई केली होती. या कमाईनंतर वेड चित्रपटाचे २४ दिवसांचे कलेक्शन ५५.२२ कोटींवर पोहोचले आहे. या चित्रपटाचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे.
रितेश आणि जिनिलिया देशमुखने रविवार झालेल्या दमदार कमाईबाबत पोस्ट शेअर करत आनंद व्यक्त केला. त्यांनी याला 'स्मॅशिंग संडे' असे म्हटले आहे आणि प्रत्येक आठवड्यात किती कमाई झाली याची माहितीही 'वेड'च्या टीमकडून देण्यात आली आहे. सध्या थिएटरमध्ये वेडचा चौथा आठवडा सुरू आहे. या आठवड्यात चांगली कमाई झाल्यास ७५ कोटींचा टप्पाही दूर नाही.
पहिला आठवडा - २०.६७ कोटी
दुसरा आठवडा - २०.१८ कोटी
तिसरा आठवडा - ०९.९५ कोटी
पहिल्या वीकेंडला झालेली कमाई - १०.०० कोटी
दुसऱ्या वीकेंडला झालेली कमाई - १२.७५ कोटी
तिसऱ्या वीकेंडला झालेली कमाई - ०६.८१ कोटी
चौथ्या वीकेंडला झालेली कमाई - ०४.४२ कोटी
'वेड' चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरील कमाई पाहून सर्वजण थक्क झाले आहेत. याशिवाय रितेश-जिनिलियाचे राज्याबाहेरही चाहतेही त्यांचे कौतुक करत आहेत. या कलाकारांच्या सोशल मीडियावर कमेंट करत त्यांची प्रशंसा होताना दिसते आहे.